कॅनडात भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या!

तपास सुरु 

कॅनडात भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या!

ब्रिटिश कोलंबियातील अॅबॉट्सफोर्ड शहरात सोमवारी सकाळी भारतीय वंशाच्या एका ६८ वर्षीय व्यावसायिकाची त्यांच्या कारमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने परिसर सील करून तपास सुरू केला असून, जवळील काही शाळांमध्ये काही काळासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली.

मृत व्यावसायिकाची ओळख दर्शन सिंग साहसी अशी करण्यात आली आहे. ते मूळचे लुधियाना (पंजाब) येथील रहिवासी असून, सध्या कॅनम इंटरनॅशनल या कंपनीचे अध्यक्ष होते. साहसी यांच्या मुलगा अर्पण यांच्या म्हणण्यानुसार, “कॅनम इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठ्या कपड्यांचे पुनर्वापर करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.”

अॅबॉट्सफोर्ड पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी रिजव्ह्यू ड्राइव्हच्या ३१३०० ब्लॉकमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. “आम्ही परिसर सुरक्षित केला आणि ही घटना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वाहनात घडल्याची पुष्टी केली. वाहनाच्या आत ६८ वर्षीय व्यक्ती जीवघेण्या जखमांसह आढळले,” असे पोलिसांनी सांगितले. प्रथमोपचारकर्त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र साहसी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा : 

प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : टी२० सामन्यांत सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज

स्मृती मंधानाचा दबदबा कायम

अय्यर ठीक आहेत, फोनवर उत्तर देतोय : सूर्यकुमार

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोर जवळच आपल्या कारमध्ये थांबलेला होता. दर्शन सिंग साहसी आपल्या गाडीत बसताच हल्लेखोराने गोळीबार केला आणि तत्काळ घटनास्थळावरून फरार झाला. व्हँकूवर सनच्या मते, साहसी १९९१ मध्ये पंजाबमधून कॅनडाला स्थलांतरित झाले होते आणि त्यांनी काही मोजक्या कर्मचाऱ्यांसह त्यांची कंपनी सुरू केली होती. 

Exit mobile version