29 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरक्राईमनामाइस्रायल सीमेवर गोळीबारात ठार झालेला भारतीय तरुण नोकरी आमिषाचा ठरला बळी; कुटुंबाचा...

इस्रायल सीमेवर गोळीबारात ठार झालेला भारतीय तरुण नोकरी आमिषाचा ठरला बळी; कुटुंबाचा दावा

थॉमस गॅब्रिएल परेरा यांना इस्रायल सीमेजवळ जॉर्डनच्या सुरक्षा दलांनी केले ठार

Google News Follow

Related

जॉर्डनमधून बेकायदेशीरपणे इस्रायलमध्ये प्रवेश करताना गोळ्या घालून ठार करण्यात आलेल्या थॉमस गॅब्रिएल परेरा या भारतीय व्यक्तीच्या कुटुंबाने तो नोकरी घोटाळ्याचा बळी ठरल्याचा दावा केला आहे. परेरा यांना १० फेब्रुवारी रोजी इस्रायल सीमेजवळ जॉर्डनच्या सुरक्षा दलांनी ठार केले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, त्यांना जॉर्डनमध्ये बनावट नोकरीच्या ऑफरने फसवले गेले आणि जेव्हा जोर्डनमध्ये यश मिळाले नाही तेव्हा परेरा यांनी काम मिळेल या आशेने इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

जॉर्डनमध्ये उच्च पगाराची नोकरी देण्याच्या आश्वासनाने परेरा याची दिशाभूल झाल्याचे त्याच्या कुटुंबाने सांगितले. जेव्हा नोकरीची ऑफर तिकडे जाऊन प्रत्यक्षात मिळाली नाही, तेव्हा त्याने इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला वाटले की त्याला इस्रायलमध्ये काम मिळेल. रोजगाराच्या नावाने अनेक भारतीयांची फसवणूक आणि कामाच्या शोधात बेकायदेशीरपणे स्थलांतर होण्याचे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे.

परेरा यांचा मृतदेह सध्या जॉर्डनमध्येचं असून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, त्यांचे अवशेष भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कागदपत्रांची प्रक्रिया आणि इतर गोष्टी पूर्ण होण्यासाठी एक किंवा दोन दिवस लागतील अशी शक्यता आहे. दरम्यान, परेरा यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुष्टी केली की जॉर्डनमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख पडताळली आहे आणि मृतदेह नेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

थॉमस परेरा यांचा मेहुणा, एडिसन चार्लस हे त्यांच्यासोबतचं होते. ते गोळीबारात जखमी झाले. त्याला वैद्यकीय उपचार मिळाले आणि नंतर त्याला भारतात परत पाठवण्यापूर्वी दोन आठवडे तुरुंगात ठेवण्यात आले. दोघेही केरळचे होते आणि ऑटो-रिक्षा चालक म्हणून काम करत होते. एका एजंटने त्यांना जॉर्डनमध्ये दरमहा ३.५ लाख रुपये पगारासह ब्लू-कॉलर नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.

चार्लसने यांनी सांगितले की, भारत सोडण्यापूर्वी त्याने एजंटला २.१ लाख रुपये आणि टुरिस्ट व्हिसावर जॉर्डनला पोहोचल्यानंतर आणखी पैसे दिले. त्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला अम्मानला पोहोचल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, इथे कोणतीही नोकरी उपलब्ध नाही. पुढे एजंटने त्यांना बेकायदेशीरपणे इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला आणि तेथे नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध असल्याचा दावा केला.

हे ही वाचा..

महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे सोशल मीडिया हाताळणाऱ्या ‘त्या’ सहा प्रतिभावान महिला कोण आहेत?

हंपीमध्ये इस्रायली पर्यटकासह तरुणीवर सामुहिक बलात्कार; पुरुष साथीदारांवर केला हल्ला

चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ होणार मालामाल; किती रुपये मिळणार बक्षीस?

फेब्रुवारीत २२० कोटींहून अधिक आधार ऑथेंटिकेशन व्यवहार

चार्लस यांनी सांगितले की, आम्हाला एका गाडीतून नेण्यात आले. ते अंतर बरेच होते. आम्ही दुपारी २ वाजता गाडीत चढलो आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचलो. त्यानंतर आम्हाला किनारपट्टीवरून अनेक किलोमीटर चालायला लावण्यात आले. अंधारात चालत असतानाच आम्हाला गोळ्या घालण्यात आल्या. जॉर्डनमधील भारतीय दूतावासाने परेराच्या कुटुंबाला पाठवलेल्या पत्रानुसार, सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी इशारा ऐकला नाही आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तेव्हा एक गोळी थॉमसच्या डोक्यात लागली आणि तो जागीच मरण पावला. मात्र, चार्लसने याला विरोध केला आणि म्हटले की, रक्षकांकडून असा कोणताही इशारा मिळाला नव्हता. त्यांनी फक्त गोळीबार केला. मी अंधारात इतरांच्या मागे चालत होतो. तेवढ्यात गोळी मला लागली आणि मी बेशुद्ध पडलो. थॉमसचे काय झाले हे मला काहीच कळले नाही. पुढे तुरुंगात असताना, तो त्याच्या पत्नीशी संपर्क साधण्यात आणि घडलेल्या घटनेची माहिती देण्यात यशस्वी झाला. त्यानंतर त्याच्या पत्नीने भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. २८ फेब्रुवारी रोजी चार्लसला भारतात पाठवण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा