28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरक्राईमनामाशीना बोरा हत्याकांड, इंद्राणी मुखर्जी सहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर

शीना बोरा हत्याकांड, इंद्राणी मुखर्जी सहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर

Related

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी साडे सहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आली आहे. शुक्रवार, २० मे रोजी सायंकाळी मुखर्जी भायखळा तुरुंगाच्या बाहेर आली. साडे सहा वर्षांनंतर मुखर्जी हिला जामीन मिळाला आहे. जामिनाची रक्कम दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली असून इंद्राणीला दोन आठवड्यांत ही रक्कम जमा करावी लागेल, असे न्यायालयाने सांगितले. साडे सहा वर्षानंतर पहिल्यांदाच इंद्राणी मुखर्जी यांनी तुरुंगाच्या बाहेर पाऊल ठेवले.

गेल्या सहा वर्षापासून इंद्राणी मुखर्जी जामिनासाठी प्रयत्न करत होती. एवढी वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या इंद्राणी मुखर्जीने माध्यमांशी संवाद साधला आहे. तुरुंगातून बाहेर आल्याने मला खूप आनंद होत असल्याचे यावेळी तिने सांगितले आहे.

इंद्राणी मुखर्जी ही तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी आहे. २०१२ मध्ये शीना बोराचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. मुंबईच्या हद्दीत एका खड्ड्यात मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीचा हात असल्याचे म्हटले जात होते. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीचा पती आणि मीडिया व्यावसायिक पीटर मुखर्जी हा देखील या प्रकरणात आरोपी होता. या प्रकरणात पीटर मुखर्जी यांनी तुरुंगवासही भोगला आहे.

हे ही वाचा:

‘राजकारणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या कबरीवर फुले उधळतील’

मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला

जामीन देताना न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सीबीआय न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जायचे नाही, तसेच पासपोर्ट सीबीआयकडे जमा करावा अशा प्रमुख अटी इंद्राणी यांना घालण्यात आल्या आहेत. जामिनावर सुटका झाल्यानंतर स्वत:चा घरचा पत्ता व फोन नंबर आणि सर्व तपशील सीबीआयला द्यायचा आणि त्यात बदल झाला तरी ते त्वरित कळवायचे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच, सरकारी पक्षाच्या साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही, अशी अटही घालण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा