28 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
घरक्राईमनामादहा वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणारा जगताप धर्मांतरणप्रकरणी अटकेत

दहा वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणारा जगताप धर्मांतरणप्रकरणी अटकेत

Google News Follow

Related

धर्मांतरण प्रकरणात आता उत्तर प्रदेश दहशवादी पथकाने (ATS) आणखी एकाला शुक्रवारी अटक केली. महत्त्वाचे म्हणजे त्याचे नाव धीरज जगताप असून तो यवतमाळ जिल्ह्यातील आहे. त्याला एटीएसने कानपूरला ताब्यात घेतले.

संशयास्पद हालचालीमुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि लखनौ येथे आणले. तिथे त्याला अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली.

शनिवारी जगतापला न्यायालयासमोर हजर केले जाईल. जगतापने दहा वर्षांपूर्वी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. त्यानंतर त्यानेही इतरांचे धर्मांतरण करण्यास सुरुवात केली. इस्लामचा स्वीकार करण्यासाठी तो कवडे आणि इतरांसह लोकांना आमिष दाखवत असे. त्यासाठी त्याने अनेक व्हॉट्सऍप ग्रुप तयार केले होते. त्याद्वारे तो लोकांना भुलवत असे आणि इस्लामचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करत असे, अशी माहिती एटीएसकडून समोर आली आहे.

जून महिन्याच्या २० तारखेला एटीएसने धर्मांतरण केल्याप्रकरणात काही लोकांना अटक केलेली आहे.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेच्या स्पेशल ट्रेनचा कालावधी वाढला

शोपियानमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान

भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर

अमरिंदर-शहा भेटीनंतर चन्नी-मोदी भेट

या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत मौलाना उमर गौतम, मौलाना कलिम सिद्दिकी, रामेश्वर कवडे उर्फ ऍडम, भूप्रिया बिंदो उर्फ अर्सलन, मुस्तफा आणि कौसर आलम यांना अटक केली गेली आहे. यापैकी कवडे, भूप्रिया, आलम हे महाराष्ट्रातील आहेत. इस्लाम स्वीकारण्यासाठी लोकांना आकर्षित करण्याकरिता इस्लामिक युवा फेडरेशनचा तो सदस्यही बनला होता. धर्मांतरणासंदर्भात या गटाचे देशभरात जाळे पसरले होते.

जगतापने नोकरीचे आमीष दाखवून अनेकांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते. तसेच धर्मांतरणासाठी बनावट कागदपत्रेही तो तयार करत असे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा