29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारण‘गेल्या दोन वर्षांत ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना मदतच नाही’

‘गेल्या दोन वर्षांत ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना मदतच नाही’

Google News Follow

Related

देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

आज शेतकरी प्रचंड संकटात आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष मायबाप सरकारकडे आहे. गेल्या दोन वर्षांत कोणतीही मदत शेतकर्‍यांना झाली नाही. टीव्हीवर घोषणा दिसतात. पण, तपासून कुणी पाहत नाही. आधीच्या १५ वर्षांत जितकी मदत मिळाली नाही, त्याहून अधिक मदत आम्ही ५ वर्षांत दिली, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर कठोर टीका केली.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे आज लोकार्पण फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांप्रती ठाकरे सरकारची जी बेफिकीर वृत्ती दिसते आहे, त्यावर टीका केली.

ते म्हणाले, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करू. गप्प बसणार नाही! ही जबाबदारी झटकण्याची नाही, तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आहे. आमच्या काळात पीक विमा आणि नुकसानीची अशी दोन्ही प्रकारची मदत मिळत होती. आता मात्र केवळ घोषणा आणि आदेश निघतात. पण कोणतीही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सरकार म्हणते पंचनामे झाले की मदत करू, पण पंचनामे होतानाही कुठे दिसत नाही.

फडणवीस यांनी सांगितले की, ही विशेष परिस्थिती आहे. त्यामुळे विशेष मदत शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने केली पाहिजे. गेल्या २ वर्षांपासून सातत्याने काही ना काही संकट शेतकऱ्यांवर येत आहेत. त्यामुळे तातडीने आणि भरघोस मदत त्यांना मिळाली पाहिजे.

हे ही वाचा:

चीनने केली तालिबानला खुश करण्यास सुरुवात

शोपियानमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान

मध्य रेल्वेच्या स्पेशल ट्रेनचा कालावधी वाढला

अमरिंदर-शहा भेटीनंतर चन्नी-मोदी भेट

यवतमाळमधील निळापूर येथे पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याठिकाणी आज भेट देऊन पाहणी केली. कापूस आणि सोयाबीनचे अतिशय चांगले पीक असताना संपूर्ण नुकसान झाले आहे. कापसाची बोंड पूर्णतः काळी पडली आहेत, याची नोंदही फडणवीस यांनी घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा