28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरदेश दुनियाचीनने केली तालिबानला खुश करण्यास सुरुवात

चीनने केली तालिबानला खुश करण्यास सुरुवात

Related

चीनने तालिबानसाठी चक्क स्वतःच्या तिजोरीचे दरवाजे उघडले आहेत. तालिबान सरकारसाठी बीजिंगने आर्थिक मदत जाहीर केली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानला ३१ दशलक्ष डॉलर्स मदतीची घोषणा केली होती. या मदतीचा पहिला हिस्सा आता तालिबानला पोहोचला सुद्धा. याअंतर्गत आणीबाणीच्या काळासाठी करण्यात आलेली मदत आहे. यामध्ये हिवाळ्यासाठी लागणारे कपडे आहेत. तसेच गरजेच्या वस्तूंचाही समावेश आहे. चीनने ही मदत पाठवली असल्याचे वृत्त चीनच्या शिन्वा या वृत्तसंस्थेने दिलेले आहे.

चीनचे अफगाणिस्तानमधील राजदूत वॅंग यू आणि अफगानिस्तानमधील काळजीवाहू सरकारचे निर्वासितांचे मंत्री खलील उर रहमान हक्कानी विमानतळावर उपस्थित होते. पुढच्या मदतीच्या टप्पा हा अन्नधान्य तसेच इतर आवश्यक सामग्रीचा असणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी देश आर्थिक संकटात असल्याचे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे असे अफगानिस्तानातील काळजीवाहू सरकारचे मंत्री खलील उर रहमान हक्कानी यांनी म्हटले. तालिबानचे हंगामी परराष्ट्र मंत्री मुत्ताकी म्हणाले की ही मदत योग्य वेळी आली आहे. दोन्ही देशांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले आहेत. आता ज्या लोकांना मदतीची गरज आहे अशांना आम्ही मदत करू, असं ते म्हणाले.

हे ही वाचा:

शोपियानमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान

ठाकरे सरकारच्या काळात मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे

कन्हैया कुमार हा दुसरा नवज्योतसिंग सिद्धू

भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर

चीनचे राजदूत वांग म्हणाले की, अफगाणी लोकांना संकटकाळात चीन मानवतावादी दृष्टिकोनातून आपत्कालीन मदत साहित्याची व्यवस्था करत आहे. हिवाळ्यातील जॅकेट्स आणि इतर साहित्य जे अफगाणिस्तानच्या लोकांना तातडीने आवश्यक आहे ते या खेपेला देण्यात आलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून अफगाणिस्तानातील संघर्षामुळे ६,३४,०००  पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. त्याचबरोबर २०१२ पासून सुमारे ५५ लाख लोकांनी स्थलांतर केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा