27 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरक्राईमनामाजेटच्या नरेश गोयल यांनी परदेशातल्या मालमत्तेसाठी बँक कर्जाचा निधी वळवला

जेटच्या नरेश गोयल यांनी परदेशातल्या मालमत्तेसाठी बँक कर्जाचा निधी वळवला

तपास एजन्सीचा जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर आरोप

Google News Follow

Related

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ५३८ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दुबई आणि ब्रिटनसह परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी बँक कर्जाच्या निधीचा कथितपणे वापर केल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे.

 

शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी इतर आरोपींशी संगनमत करून कॅनरा बँकेच्या सहाय्यक कंपन्यांच्या मदतीने बँक कर्जाचा निधी काढून आणि बोगस खर्च दाखवून फसवणूक केली, असे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले. या निधीचा वापर करून गोयल यांनी दुबई आणि ब्रिटनसह परदेशात विविध मालमत्ताही विकत घेतल्या, असे तपास संस्थेने म्हटले आहे. अर्न्स्ट अँड यंग फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टनुसार, नरेश गोयल यांनी कर्जाची रक्कम बेकायदा वळवली, असे ईडीने म्हटले आहे.

 

नरेश गोयल यांनी व्यावसायिक आणि सल्लागार खर्च म्हणून एक हजार कोटी रुपयांचा संशयास्पद खर्च केला होता. या खर्चांमध्ये स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे वैयक्तिक खर्च तसेच, प्रवर्तकांच्या परदेशी खात्यांमध्ये जमा केलेले बेहिशेबी व्यवहार यांचा समावेश आहे. जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल)ने दुबई, आयर्लंड आणि इतर कर-स्थित विदेशी संस्थांकडे निधी वळवला..

 

नरेश गोयल आणि अनिता गोयल यांचे नातेवाईक संचालक असलेल्या अनेक जनरल सेलिंग एजंट्स (GSA) सोबत करार केले गेले. त्याचा खर्च म्हणून तीन हजार कोटींहून अधिक रकमेचा भरणा करण्यात आला, त्यातील एक महत्त्वपूर्ण भाग जेट एअर एलएलसी, जेट एअर यूके लिमिटेड, जेटएअर प्रा. लिमिटेड आणि जेटएअर लिमिटेड यांना देण्यात आला. नरेश गोयल हे जेटएअर एलएलसी, दुबई या कंपनीचे १५ टक्के भागधारक आहेत. १९ जुलै रोजी ईडीच्या अधिकार्‍यांनी चार्टर्ड अकाउंटंट्स आणि सल्लागारांसह अनेक ठिकाणी शोध घेतला. त्यांना जेट एअरवेजने मोठ्या प्रमाणात पैसे दिले होते. मात्र फॉरेन्सिक ऑडिट अहवालात यात अनियमितता दिसून आली.

 

हे ही वाचा:

‘सनातन धर्म म्हणजे मलेरिया, डेंग्यूसारखा…’

अंधेरी पूर्व ते विमानतळ भूमिगत मेट्रोच्या भुयारीकरणाला प्रारंभ

आमदार नरेंद्र मेहताच्या मुलाच्या मोटारीचा सी लिंकवर भीषण अपघात

बालासोर रेल्वे अपघातासाठी ३ रेल्वे अधिकारी जबाबदार

तपास संस्थेने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे गोळा केल्यानंतर नरेश गोयल यांना दोन वेळा समन्स बजावले, परंतु ते त्यांच्यासमोर हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी नवीन समन्स जारी केले आणि दिल्लीतील त्यांच्या घरी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, त्यांना यापूर्वी तपास यंत्रणेसमोर गैरहजर राहण्याबाबतही जाब विचारण्यात आला. मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना अखेर अटक करण्यात आली. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने नरेश गोयल यांना ११ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा