29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
घरविशेषसप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे हवामान विभागाची माहिती

Google News Follow

Related

देशात यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव दिसल्याने जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस बरसलेला नाही. पावसाने दडी दिल्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पेरण्या होऊ शकल्या नाहीत. पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये किती पाऊस होतो याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत. पुणे हवामान विभागाने या महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

 

कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत जात आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात ४ सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांत यलो अलर्ट जारी केला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितले. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असणार आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे.

हेही वाचा..

जेटच्या नरेश गोयल यांनी परदेशातल्या मालमत्तेसाठी बँक कर्जाचा निधी वळवला

नाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण !

अंधेरी पूर्व ते विमानतळ भूमिगत मेट्रोच्या भुयारीकरणाला प्रारंभ

बालासोर रेल्वे अपघातासाठी ३ रेल्वे अधिकारी जबाबदार

प्रदीर्घ विश्रांतीनंतर नाशिक परिसरात पाऊस झाला. नाशिकच्या कळवणसह बेज, पिळकोस, भादवणसह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. दोन तास सुरू असलेल्या पावसाने शेतासह सखल भागात पाणी साचले होते. पाऊस परतल्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून आणखी दमदार पाऊस पडण्याची आशा कायम आहे. नाशिकमधील धरणांमध्ये अजून पुरेसा जलसाठा झालेला नाही.

 

हवामान विभागाने मागील १०० वर्षांत प्रथमच ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याचे म्हटले आहे. पुणे आणि परिसरात ऑगस्टमध्ये ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात परिस्थिती बदलणार आहे. या महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आयएमडीचे हवामान शास्त्रज्ञ अनुप कश्यपी यांनी व्यक्त केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा