महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. आरोपी जितेंद्र शिंदे याने स्वत:च्या कपड्यानी गळफास लावून घेतल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
अहमदनगर येथील कोपर्डीमध्ये १३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती.या घटनेननंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता.त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोर्चही निघाले होते.आरोपीना फाशीची शिक्षा द्या अशी जनतेतून मागणी आली होती. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती.त्यातील जितेंद्र जोशी हा मुख्य आरोपी होता.
हे ही वाचा:
आदित्य एल-१चे पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत पाऊल !
आर्थिक समावेशनाचे ४७ वर्षांचे लक्ष्य ६ वर्षांत पूर्ण
मिर्चीचा ठेचा आणि भाकरी ठाकरेंना पचेल काय ?
आमदार रवींद्र वायकर यांनी तथ्य दडपले!
तो पुण्यातील येरवडा कारागृहात आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता.त्याने आज पहाटेच्या सुमारास कारागृहात स्वत:च्या कपड्यानी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.