27 C
Mumbai
Wednesday, September 23, 2026
घरक्राईमनामाजेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचे आरोप

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचे आरोप

१० विद्यार्थ्यांच्या तक्रारीं

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये एका प्राध्यापकावर लैंगिक छळ आणि अनुचित वर्तनाचे गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्राध्यापकाविरोधात १० विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. सुमारे महिनाभरापूर्वी एका विद्यार्थिनीने या प्रकरणी पहिली तक्रार केली होती. त्यानंतर काही वरिष्ठ तसेच माजी विद्यार्थ्यांनीही पुढे येत प्राध्यापकाविरोधात कथित गैरवर्तनाच्या तक्रारी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तक्रारींनुसार, संबंधित प्राध्यापक विद्यार्थ्यांना कॅम्पसमधील आपल्या निवासस्थानी बोलावत असत. या भेटीदरम्यान अनुचित वर्तन केल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच वर्गात आणि इतर ठिकाणी आक्षेपार्ह स्वरूपाच्या टिप्पणी केल्याचेही तक्रारींमध्ये नमूद असल्याचे वृत्त आहे. काही विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या वर्तनामुळे अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या सर्व आरोपांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे तक्रारींमधील तथ्य तपासण्यासाठी विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
बिहारमध्ये गंगा नदीचा रौद्रावतार

गरबा, दांडियात मुस्लिम नको…सगळ्यांनी टिळा लावा, आधार कार्ड तपासा!

मोदींचा टोला…लाल किल्ल्यावरून दिली ‘दिमागी नक्षल’ची होमिओपॅथिक गोळी

राज ठाकरे म्हणतात, गणेशोत्सवात दंगली घडवल्या जाणार!

पहिल्या तक्रारीनंतर इतर विद्यार्थ्यांनीही पुढे येत आपले अनुभव मांडल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. चौकशीदरम्यान आणखी विद्यार्थी तक्रार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हे प्रकरण विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशीच्या टप्प्यात असून, पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल झाल्याची माहिती नाही. त्यामुळे समितीच्या चौकशीत नेमके कोणते तथ्य समोर येते आणि त्यानंतर विद्यापीठ प्रशासन संबंधित प्राध्यापकाविरोधात कोणती कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा