31 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरक्राईमनामाधक्कादायक! मोदीविरोधक पत्रकार राणा अय्युबने पीएम केअरला दिली देणगी

धक्कादायक! मोदीविरोधक पत्रकार राणा अय्युबने पीएम केअरला दिली देणगी

Google News Follow

Related

पत्रकार राणा अय्युब यांनी आयकर चौकशीनंतर पीएम केअरला आणि मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी ७४.५ लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. राणा अय्युब यांची ED आणि प्राप्तिकरने त्यांच्या आर्थिक तपासाला सुरुवात केल्यानंतर अय्युब यांनी वीस दिवसांनी पीएम केअर आणि सीएम रिलीफ फंडात रक्कम हस्तांतरित केली आहे, असे म्हटले जात आहे. मुख्य म्हणजे राणा अयुब या पंतप्रधानांवर सातत्याने टीका करत असतात, पण त्यांनी ७४ लाख रुपये पीएम केअर फंडला दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या एफआयआरच्या आधारे राणा अय्युब यांचा तपास सुरू करणाऱ्या ईडीने चौकशीचा एक भाग म्हणून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) १५ डिसेंबर २०२१ रोजी राणा अय्युबला समन्स बजावले होते.

राणा अय्युब यांनी सुरू केलेल्या विशिष्ट मोहिमांसाठी देणगीदारांनी निधी दिला होता परंतु ती रक्कम तिने विशिष्ट कारणासाठी वापरली नाही आणि ती तिच्या बँक खात्यात आणि तिच्या वडिलांच्या बँक खात्यात ठेवली.
अंमलबजावणी संचालनालयाने पत्रकार राणा अय्युब हिच्यावर “तिच्या व्यावसायिक कमाई बँक खात्यात निधी प्राप्त करून ही निधी तिच्या एका प्रोजेक्टची असल्याच्या प्रयत्न केल्याचा तिच्यावर आरोप आहे.” मात्र तिच्यावर लावलेले सर्व आरोप तिने स्पष्टपणे नाकारले आहेत.

मदत कार्यासाठी जमवलेल्या पैशाने उघडली एफडी
राणा अय्युबने तिच्या नावावर मुदत ठेव (FD) खाते उघडण्यासाठी मदत कार्यासाठी उभारलेल्या २.७७ कोटी रुपयांमधून पन्नास लाख रुपये काढून ठेवले, असे ईडीला आढळून आले आहे. तसेच तिने वैयक्तिक खर्चासाठी ही निधी वापरली असा ईडीला संशय आहे. राणा अय्युबचे वडील आणि बहिणीच्या खात्यात जवळपास दोन कोटी ६९ लाख रुपये हस्तांतरीत करण्यात आले.तथापि, राणा अय्युबने ईडीला सांगितले होते की, हे पैसे नंतर तिच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले जेणेकरून ती मदत कार्यासाठी वापरू शकेल.

राणा अय्युब यांनी केट्टो या क्राउडफंडिंग वेबसाइटवर वर्षभरात तीन मोहिमा सुरू केल्या होत्या. त्यामध्ये ‘झोपडपट्टीतील रहिवासी आणि शेतकऱ्यांसाठी निधी उभारण्यात मदत’, ‘आसाम, बिहार आणि महाराष्ट्रासाठी मदत कार्य’ आणि ‘राणा अय्युब आणि त्यांच्या टीमला मदत’ अश्या या तीन मीहोम होत्या.

हे ही वाचा:

‘राऊत आणि परबांसाठी अनिल देशमुखांच्या बाजूच्या खोल्या सॅनिटाइज कराव्यात’ 

हिजाब वादाप्रकरणी आयबीने दिला पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा!

आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमिट्स कोसळले

उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर सेबीचे कठोर निर्बंध…

गेल्या सप्टेंबरमध्ये, यूपी पोलिसांनी राणा अय्युबच्या विरोधात भारतीय दंड संहिता,आयटी कायदा आणि ब्लॅक मनी कायद्यानुसार, एफआयआर दाखल केला होता आणि तिच्यावर चॅरिटीच्या नावाखाली सामान्य लोकांकडून बेकायदेशीरपणे पैसे मिळवल्याचा आरोप केला होता.

राणा अय्युबने सादर केलेली ३१ लाख १६ हजार ९७० रुपयांची खर्चाची कागदपत्रे अखेरीस बनावट असल्याचे आढळून आले आणि मदत कार्य म्हणून दाखविलेला खर्च नंतर तिच्या वैयक्तिक विमान प्रवासासाठी केलेला खर्च असल्याचे आढळून आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा