32 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
घरराजकारणहिजाबच्या समर्थनात काँग्रेसचे आंदोलन, पण महिला कार्यकर्त्यांचा आपसातच राडा

हिजाबच्या समर्थनात काँग्रेसचे आंदोलन, पण महिला कार्यकर्त्यांचा आपसातच राडा

Google News Follow

Related

कर्नाटक मधल्या हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष हिजाबच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. महाराष्ट्रात मालेगाव, पुणे, मुंब्रा अशा विविध भागात हिजबसाठी महिला रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. यातच आता कल्याणची भर पडली आहे.

कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीने हिजाब च्या समर्थनार्थ मोर्चा काढला. पण या मोर्चाच्या दरम्यानच सहभागी आंदोलक महिल्या आपसात भिडल्याची घटना पुढे आली. कल्याण येथील शिवाजी चौकात हा मोर्चा आलेला असताना अचानक मोर्चात गडबड सुरू झाली.

या मोर्चात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. तर मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळाली. अशातच अचानक काही महिलांमध्ये झटापट सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले. आंदोलनाच्या वेळी काही महिलांनी वाद घातल्यामुळे ही बाचाबाची सुरू झाल्याचे दिसले. महिलांच्या दोन गटांमध्ये उठलेल्या या वादंगानंतर या आंदोलनाने वेगळेच वळण घेतले. तर हा राडा नेमका कसा थांबवायचा हा पेच पोलिसांसमोर दिसला.

हे ही वाचा:

आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमिट्स कोसळले

हिजाब वादाप्रकरणी आयबीने दिला पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा!

पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ममता बॅनर्जींना झटका! अधिवेशन केले बरखास्त

‘भाजपने खंजीर खुपसला, आम्ही मात्र मैत्री जपतो’

दरम्यान हे आंदोलन उढळण्यासाठी जाणीवपूर्वक काही महिलांना पाठवण्यात आले असा आरोप कल्याणच्या काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी केला आहे. गझल मांडेकर नावाच्या एका मुस्लिम महिलेने काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत वाद घातल्याचे समोर आले आहे. हिजाब आमचा हक्क असून तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण काँग्रेस या प्रकरणाचे राजकारण करत आहे असा आरोप गझल यांनी केला आणि त्यानंतरच हा वाद सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान या वादामुळे हे आंदोलन चांगलेच फसले. काँग्रेसच्या आंदोलनात झालेल्या घडामोडींमुळे कक्षात जायची ई कार्यकर्त्यांनी आंदोलन अर्थातच गुंडाळून घरचा मार्ग स्वीकारला असल्याचे म्हटले जात आहे. कल्यामध्ये हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा