28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरक्राईमनामाकबड्डीचा सराव करत असतानाच मुलीची हत्या करणारा आरोपी ताब्यात

कबड्डीचा सराव करत असतानाच मुलीची हत्या करणारा आरोपी ताब्यात

Related

पुण्यात एका अल्पवयीन मुलीच्या झालेल्या हत्येतील मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या घडल्याचे म्हटले जात असले तरी हा आरोपी या मुलीचा नातेवाईक असल्याचेही समोर आले आहे.

सदर मुलगी ही कबड्डीपटू असून ती आठवीत शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मुलीचा नातेवाईक होता. ती बिबवेवाडी येथे कबड्डीचा सराव करत होती. त्यावेळी मुख्य आरोपी आणि इतर दोघांनी तिच्याजवळ येत तिच्यावर हल्ला केला. मुख्य आरोपीने तिच्यावर कोयत्याने वार केले. गळ्यावर वार केल्यामुळे ती मुलगी जागीच कोसळली आणि मृत्युमुखी पडली. मुलीचे डोके धडावेगळे करण्याचा त्याचा इरादा होता. या आरोपीकडे पिस्तुलही होते, ते टाकून तो पाळाला. पण आता त्याला अटक करण्यात आले आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली असून गेल्या काही महिन्यांत महिलांवर अत्याचाराच्या घटनांत झालेली वाढ ही महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

 

हे ही वाचा:

शरद पवार आयकर छाप्यांबाबत बोलणार?

‘मुंबईत फक्त आरेतील वृक्ष प्राणवायू देतात का?’

‘महात्मा गांधींच्या सूचनेवरून सावरकरांनी केली होती दयायाचिका’

कुर्ल्यात कशा जळल्या २० ते ३० दुचाकी?

 

पुण्यात मागे एका अल्पवयीन मुलीवर अनेकांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. तर मुंबईतही एका महिलावर निर्भयाप्रमाणेच घृणास्पद कृत्य करण्यात आले होते. डोंबिवलीतही ३३ जणांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर विविध स्तरावर टीकेची झोड उठली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सवाल उपस्थित केला की, अशा प्रकरणात नीलमताई गोऱ्हे, विद्या चव्हाण या महिलांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या नेत्या कुठे आहेत. सुप्रिया सुळे खड्ड्यांचे सेल्फी घेतात, इथे त्या संवेदनशीलता का दाखवत नाहीत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा