34 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरक्राईमनामागुरुग्राममध्ये महिला बाईकस्वाराला धडक देणाऱ्या कल्याण बैंसलाला अटक

गुरुग्राममध्ये महिला बाईकस्वाराला धडक देणाऱ्या कल्याण बैंसलाला अटक

पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर महिला बाइकरला कारने धडक दिल्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला बाइकरचा पाठलाग करून तिच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप असलेला कल्याण बैन्सला याला गुरुग्राम पोलिसांनी राजस्थानच्या दौसा येथून अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आले होते. ही घटना रविवारी गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर घडली. पीडित महिला बाइकरची ओळख सिया अशी असून ती आपल्या काही मित्रांसोबत स्पोर्ट्स बाइक्सवरून प्रवास करत होती. त्यावेळी एक कार त्यांच्या मागे येत असल्याचे सियाने सांगितले.

सियाच्या म्हणण्यानुसार, कारमधील व्यक्ती वारंवार तिच्या जवळ येत होती. त्यामुळे तिने कार चालकाला अंतर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर कारमधील व्यक्तींनी तिला थांबण्यास सांगितल्याचा आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप सियाने केला. यानंतर काही वेळाने कारने तिच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे सिया दुचाकीवरून खाली पडली आणि रस्त्यावर काही अंतरापर्यंत घसरत गेली. तिच्या बाइकवर बसवलेल्या कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला. या घटनेचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. धडकेनंतर कार चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात केरळच्या महिला व्लॉगरला अटकेची धमकी

इमिग्रेशन न करताच तीन इटालियन नागरिक म्युनिकला रवाना

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य, उद्धव ठाकरेंची नावे

चक्क कट्टर विरोधक यशवंत सिन्हा मोदींवर खुश

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. पोलिसांनी सेक्टर ५६ पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ अंतर्गत बेदरकार वाहन चालवणे आणि कलम १२५ अंतर्गत दुखापत केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली होती. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. आता पोलिसांनी आरोपी कल्याण बैन्सला याला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा