28 C
Mumbai
Tuesday, September 15, 2026
घरक्राईमनामाजम्मू- काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करशी संबंधित तिघांना अटक

जम्मू- काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करशी संबंधित तिघांना अटक

दहशतवादी कारवायांना रसद पुरवल्याचा आरोप

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील राजौरी पोलिसांनी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) शी संबंधित ओव्हरग्राउंड वर्कर नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पीर पंजाल परिसरात कार्यरत असलेल्या कथित दहशतवादी मॉड्यूलच्या तपासादरम्यान करण्यात आली.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची ओळख जाकीर हुसेन, मोहम्मद आझम आणि मोहम्मद मुश्ताक अशी झाली आहे. तिघेही राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी दहशतवाद्यांना रसद पुरवणे, सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे आणि जमिनीवरून इतर प्रकारची मदत करणे यामध्ये कथितरित्या सहभागी होते. तसेच त्यांनी दहशतवादी गटांना मार्गदर्शक म्हणून मदत केली आणि त्यांना काश्मीर खोऱ्याकडे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिल्याचे तपासात समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

तपासादरम्यान एका आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी IED जप्त केला. प्राथमिक तपासात हा स्फोटक उपकरण दहशतवादी गटातील सदस्यांनी आरोपींकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिला असावा आणि त्याचा संभाव्य वापर लक्ष्यित हल्ल्यासाठी करण्याची योजना असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हे ही वाचा:

गुरुग्राममध्ये महिला बाईकस्वाराला धडक देणाऱ्या कल्याण बैंसलाला अटक

अफगाणिस्तानात केरळच्या महिला व्लॉगरला अटकेची धमकी

इमिग्रेशन न करताच तीन इटालियन नागरिक म्युनिकला रवाना

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य, उद्धव ठाकरेंची नावे

दरम्यान, राजौरी पोलिसांकडून या नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे. या आरोपींचे आणखी कोणाशी संबंध होते, या नेटवर्कची व्याप्ती किती आहे आणि दहशतवादी कारवायांना नेमकी किती मदत करण्यात आली, याचा तपास केला जात आहे. पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा