31 C
Mumbai
Sunday, December 4, 2022
घरक्राईमनामाकिशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सोमय्या करणार तक्रार

किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सोमय्या करणार तक्रार

निर्मलनगर पोलिस ठाण्याला देणार भेट

Google News Follow

Related

भाजपा नेते किरीट सोमय्या हे बांद्रा पूर्व येथील निर्मल नगर पोलिस ठाण्यात जाणार असून त्यात ते माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात फसवणूक, घोटाळे, बनावट कागदपत्रे बनवणे, एसआरएच्या नावाखाली गरिबांच्या झोपड्या हडप करणे अशा प्रकारच्या आरोपासंदर्भात तक्रार करणार आहेत.

किरीट सोमय्या यानी काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले होते. पत्रकार परिषद घेऊन एसआरएच्या गाळ्यांसंदर्भात त्यांनी माहिती दिली होती.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपींनाही अटक केली होती. यादरम्यान एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर सौमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे दादर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले होते. दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांना याप्रकरणी समन्सही बजावला होता. शुक्रवारी दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली होती.

हे ही वाचा:

उपमुख्यमंत्री विठुरायाचरणी! शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं

संभाजी भिडे आणि पुरोगामी किडे

‘आळशी माणूस ऑफ द इयर’ शोधायचा असेल तर मातोश्रीवर जा

चार कोटींची ‘साडी आणि बूट’ पकडले

 

एसआरए घोटाळा जूनमध्ये नोंदवण्यात आला होता. सुरुवातीला या एफआयआरमध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नव्हते. याप्रकरणी चौकशीनंतर चार लोकांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्या चौघांपैकी एक संशयित किशोरी पेडणेकर यांच्या जवळचा आहे. तसेच एक संशयित महापालिकेचा कर्मचारीही असून आपल्या जबाबात माजी महापौरांचे त्याने नाव घेतले आहे. एसआरए घोटाळाप्रकरणी एकूण नऊ लोकांनी तक्रार केली होती. एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले होते, मात्र त्यांना फ्लॅट मिळालेच नाहीत. या प्रकरणात ज्या दोन लोकांनी पेडणेकर यांचा नाव घेतले आहे. त्यामुळे दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान, किरीट सौमय्यांनी सुद्धा यासंदर्भात ट्विट केले होते. भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो, पण माझ्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता एसआरए मध्ये सहा गाळे/ सदनिका हस्तगत केल्या आहेत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की या सदनिकांचा ताबा घ्यावा, असे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,978अनुयायीअनुकरण करा
53,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा