कोल्हापूर जिल्ह्यातील हालसवडेत गावात वडिलोपार्जित मिळालेल्या शेत जमिनीच्या वाटणीवरून चुलत भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पाच ते सहा जणांच्या हल्ल्यात श्रीमंत पांडुरंग कांबळे(५१) याचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात विनोद जनार्दन देसाई(४०) आणि मृत श्रीमंत कांबळे यांचा मुलगा ऋतुराज कांबळे जखमी झाला आहे.मयत श्रीमंत कांबळे आणि संशयित आरोपी नात्याने सख्खे चुलतभाऊ आहेत.याप्रकरणी जखमी ऋतुराज कांबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी पाच संशयितांवर गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
मयत श्रीमंत कांबळे आणि संशयित आरोपी नात्याने सख्खे चुलतभाऊ आहेत.यांची कोल्हापूर जिल्यातील हालसवडेत वडिलोपार्जित १० गुंठाची जमीन आहे. या जमिनीचा वाद नायालयातही सुरु आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मयत श्रीमंत कांबळे यांचा मुलगा रोहन शनिवारी शेतात गेल्यानंतर संशयित दशरथ कांबळे यांची मुलं खासगी मोजणी करत असताना त्याने विरोध केला. तसेच तुमची जमीन मोजून घ्या आमची मोजू नका, असे सांगितले.यानंतर शनिवारी रात्री श्रीमंत कांबळे यांच्या घराबाहेर संशयित आरोपी दशरत कांबळे व त्यांच्या मुलाने आरडाओरड सुरु केली.तू घराबाहेर ये तुला आज मारूनच टाकतो अशी धमकी दशरत कांबळे याने दिली.त्यानंतर श्रीमंत कांबळे हे घराबाहेर आल्यावर आरोपी दशरथ कांबळे आणि त्यांच्या मुलांनी कुऱ्हाड आणि चाकूने सपासप वार केले . हल्ला झाल्यानंतर श्रीमंत कांबळे हे खाली कोसळले.
हे ही वाचा:
कर्नाटकमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मुस्लीम विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास काँग्रेस सरकारची परवानगी
गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली
बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!
बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!
श्रीमंत कांबळे यांच्यावर अचानकपणे हल्ला झाल्याने त्याचा मुलगा ऋतुराज कांबळे आणि विनोद जनार्दन देसाई हे पुढे सरसावल्याने दोघेही या हल्ल्यात जखमी झाले असून कोलापूरच्या सीपीआर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.ऋतुराज कांबळे याने स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली.या प्रकरणी पोलिसांनी मोहन दशरथ कांबळे, रघुनाथ दशरथ कांबळे, वैभव नामदेव कांबळे यांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी दशरथ रुद्राप्पा कांबळे फरार झाला आहे तसेच सोबत एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.