32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषबावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!

बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!

आमदार प्रवीण दरेकर यांची टीका

Google News Follow

Related

चंंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकिट देण्यायोग्य नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये,अशी टीका शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केली होती. शरद पवारांनी बावनकुळेंवर केलेल्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.शरद पवार यांनी बावनकुळेंवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी. भाजपवर टीका करण्यापेक्षा पवारांनी त्यांचे साथीदार का सोडून गेले याचं आत्मपरीक्षण करावं, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.

कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती.माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यानंतर राज्यभरातील ठीक-ठिकाणी भाजपकडून निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.

या प्रकरणी शरद पवारांना विचारण्यात आले तेव्हा शरद पवार म्हणाले, चंंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकिट देण्यायोग्य नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये,अशी टीका पवारांनी केली.यावर भाजप नेते आक्रमक झाले.भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांना उत्तर देत म्हणाले, शरद पवार यांनी बावनकुळेंवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी.भाजपवर टीका करण्यापेक्षा पवारांनी त्यांचे साथीदार का सोडून गेले याचं आत्मपरीक्षण करावं.

हे ही वाचा:

पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!

बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

भाजपा महाराष्ट्र या ट्विटर हॅन्डलरवरून ट्विट करत पवारांवर टीका केली.शरद पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी राजकारणात आले तेव्हापासून एकाच पक्षात आहेत. त्यांची नाळ भाजपाशी जोडलेली आहे. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही, विचार बदलला नाही.काही लोकांनी राजकारणात आल्यापासून पक्ष किती बदलले आणि किती वेळा विचार बदलले हे मोजताही येणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीनं पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक माणसाबद्दल फार बोलू नये.

ज्या काँग्रेसने तुम्हाला पक्ष विरोधी कारवायांसाठी पक्षातून काढले त्याच काँग्रेससोबत तुम्ही पुन्हा युती केली! ही कृती तुमच्या कोणत्या स्वाभिमानात बसते? पवार साहेब तुमच्या याच खोट्या आणि दलबदलू प्रवृत्तीमुळे तुमचा संपूर्ण पक्ष फुटला. जीवाभावाची माणसं सोडून गेली. ती का गेलीत? तुम्ही कधी आत्मपरीक्षण करणार आहात की नाही?, भाजपा महाराष्ट्र पेजवर असं ट्विट करण्यात आलं आहे.

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा