29.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरक्राईमनामालालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाच्या नावाखाली फसवणूक

लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाच्या नावाखाली फसवणूक

१९ वर्षीय भामट्याला बेड्या

Google News Follow

Related

मुंबईतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेत भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तातडीने चरणस्पर्शाचे व्हीआयपी दर्शन घडवून देण्याचे आमिष दाखवत चार भाविकांकडून पैसे उकळल्याचा आरोप प्रणव सुरेशकुमार यादव (वय १९, रा. परेल) याच्यावर आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार इक्बाल आसमोहम्मद मन्सुरी (वय २०, रा. खार रोड) हा रिलायन्सच्या ‘आनंद सेवा’ संस्थेमार्फत लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळ परिसरात हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे काम करतो. शनिवारी दुपारी सुमारे १.४५ वाजता त्याचे मित्र दीपक दुशांत, मंथन शिंदे आणि ऋषिकेश पवार यांना लालबागच्या राजाचे तातडीने चरणस्पर्श दर्शन घेण्याची इच्छा होती. याचदरम्यान मॅग्नम टॉवरच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांची प्रणव यादव याच्याशी भेट झाली. त्याने तातडीने व्हीआयपी चरणस्पर्श दर्शनाची व्यवस्था करून देण्याचे सांगितले. त्यासाठी प्रत्येकी ८५० रुपये याप्रमाणे चौघांकडून एकूण ३,४०० रुपये मागितले. दर्शनाची घाई असल्याने त्यांनी ८०० रुपये ऑनलाइन स्कॅनरद्वारे, तर उर्वरित २,६०० रुपये रोख स्वरूपात त्याला दिले.
हे ही वाचा:
घाटकोपरमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची चाकू भोसकून हत्या

‘नाममात्र शुल्काला विरोध नको’

‘राहुल गांधींनी काँग्रेस सोडून स्टँड-अप कॉमेडियन व्हावे!’

परदेशी गुंतवणूकदारांची पुन्हा माघार

पैसे घेतल्यानंतर दर्शनाची व्यवस्था करून येतो, असे सांगून प्रणव तेथून निघून गेला. मात्र, दोन तास उलटूनही तो परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे भाविकांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतल्यानंतर प्रणव यादव त्यांना सापडला. जाब विचारला असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची दर्शनाची व्यवस्था किंवा पासेस नसल्याचे आणि केवळ पैसे उकळण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे त्याने सांगितल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. पैसे परत देण्यासही त्याने नकार दिल्यानंतर तक्रारदारांनी त्याला काळाचौकी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल जाधव करत असून, दर्शनाच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींना पैसे देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांनी भाविकांना केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा