साकीनाका येथील एक गंभीर प्रकरण समोर आले आहे, जिथे १९ वर्षीय मुस्लिम युवक जाकीरने १४ वर्षीय हिंदू मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून ट्रेनमधून पळवण्याचा प्रयत्न केला. ही घटना उघडकीस आल्यावर रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि साकीनाका पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आणि त्यांना नागपूर रेल्वे स्टेशनवर अटक केली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली.
आरोपी जाकीरला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमय्या यांनी एक्सवर पोस्टकरत म्हटले, मी आज सकाळी साकीनाका पोलिस ठाण्यात गेलो होतो, आणि मुलीचा भाऊदेखील तेथे उपस्थित होता. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरु आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कुटुंबीय, प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस सध्या या प्रकरणावर गंभीर लक्ष देत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे हिंदू संघटना आणि भाजपाकडून “लव्ह जिहाद”विरुद्ध जागरूकतेचे काम सुरु आहे. लव्ह जिहाद सारख्या घटनांना बळी पडू नये यासाठी हिंदू संघटना आणि भाजपाकडून विविध मोहीम आणि यंदाच्या नवरात्री उत्सवातही लव्ह जिहाद विरुद्ध पोस्टर लावून जनजागृतीचे काम केले होते.
मुंबईतील साकीनाका येथे "लव्ह जिहाद"
१९ वर्षीय मुस्लिम मुलगा जाकीरने १४ वर्षीय हिंदू मुलीला आमिष दाखवून ट्रेनमध्ये पळविले. RPF रेल्वे पोलिस दल आणि साकीनाका पोलिसांनी त्यांना नागपूर रेल्वे स्टेशनवर अटक केली
मी आज सकाळी साकीनाका पोलिस स्टेशनला गेलो होतो, तिचा भाऊही तिथे उपस्थित…
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 5, 2025







