भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित मोठी मागणी केली आहे. मालेगाव मधील बोगस मतदारांची नावे रद्द करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यांनी पत्रात ३२७३ बोगस मतदारांची नावे रद्द करण्याची मागणी केली आहे.
एक्सवर पोस्टकरत ते म्हणाले, मालेगाव येथील ३२७३ बोगस मतदारांची नावे रद्द करा. मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील ३२७३ लोकांची जन्म प्रमाणपत्र मालेगाव महापालिकेने रद्द केली आहे. त्यांची आधारकार्ड ही रद्द करण्यात येत आहे. त्यांची नावे मतदार यादीतून वगळावी अशी मागणी मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.
दरम्यान, सोमय्या यांनी यापूर्वी ४ ऑक्टोबर रोजी पोस्टकरत मालेगाव महानगरपालिकाने या आठवड्यात ३२७३ जन्म प्रमाणपत्रे रद्द केल्याचे सांगितले होते. रद्द करण्यात आलेल्या ३२७३ नावांची यादीही त्यांनी पोस्ट केली होती. ते म्हणाले, ही सर्व प्रमाणपत्रे वर्ष २०२४ मध्ये फसवणुकीने देण्यात आली होती.
हे ही वाचा :
मुंबईतील साकीनाका येथे “लव्ह जिहाद”
फ्रान्सचे पंतप्रधान लेकोर्नू यांचा राजीनामा; शपथविधीनंतर अवघ्या २७ दिवसांत पदत्याग!
इल्युजन ऑफ ट्रुथ; २०१६चे संशोधन, काँग्रेसचे राजकारण
भारताच्या सेवा निर्यातीत १४ टक्क्यांची वाढ
मालेगाव पोलिसांनी याप्रकरणी ५ गुन्हे/एफआयआर नोंदवले आहेत. ५३९ आरोपींना मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आणखी १००० अर्जदार/लाभार्थी यांच्या विरुद्ध गुन्हेगारी कारवाई सुरू करण्यात आली आहे. घुसखोर, बेकायदेशीर, बांगलादेशी, रोहिंग्या यांच्या विरोधातली ही सर्वात मोठी कारवाई आहे, असे सोमय्या यांनी म्हटले.
मालेगाव येथील 3273 बोगस मतदारांची नावे रद्द करा !
मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील 3273 लोकांची जन्म प्रमाणपत्र मालेगाव महापालिकेने रद्द केली आहे. त्यांची आधारकार्ड ही रद्द करण्यात येत आहे. त्यांची नावे मतदार यादीतून वगळावी अशी मागणी मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे pic.twitter.com/f3OHdV0tzf
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 6, 2025







