26 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरक्राईमनामाराज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला ४७ लाख रुपयांना फसवले!

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला ४७ लाख रुपयांना फसवले!

 चेक क्लोनिंगचा प्रकार

Google News Follow

Related

बनावट धनादेश बनवून राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाची ४७.६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागाची या प्रकारे फसवणूक करण्याची ही दुसरी घटना असून यापूर्वी पर्यटन विभागाची ६९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याने ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नमिता बाग, प्रमोद सिंग, तपन कुमार आणि झीनत खान या नावाच्या बँक खात्यावर धनादेश वठविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हाजे यांनी २२ एप्रिल रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २ मार्च ते २२एप्रिल २०२४ दरम्यान ही फसवणूक झालेली असून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या खात्याचे ४७.६० लाख रुपयांचे बनावट धनादेश तयार करण्यात आले होते व धनादेश ४ व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.

संबंधित विभागाचे खाते तपासत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी उपसचिव सुनील हाजे यांच्या तक्रारीवरून ४ व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात तीन महिलाच्या नावाने बँक खाते असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

…तर बाबरची मुले देखील देतील ‘जय श्रीराम’चा नारा!

वेंकय्या नायडू, राजदत्त, उषा उथुप, मिथुन चक्रवर्ती यांना पद्म पुरस्कार प्रदान

‘जिथे हिंसाचार झाला तिथे निवडणुकांना परवानगी नाही’

भगवान रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री?

हे बँक खाते नक्की कुठून वापरले जात आहे, तसेच हे खात्यावरील नावे खरे आहेत का याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बँक खात्यातून रक्कम काढण्यात आलेली असून या प्रकरणी तपास सुरू आहे. महिन्याभरापूर्वी असाच प्रकार राज्य शासनच्या पर्यटन विभागात झाला होता, आरोपीनी हीच पद्धत वापरून ६९ लाख रुपयांचे धनादेश बनवून विविध बँक खात्यात हे धनादेश वटविण्यात आले होते.

याप्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला होता, या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दुसरी घटना समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा चेक क्लोनिंग चा प्रकार असू शकतो, या फसवणुकीची माहितगार व्यक्तिचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा