31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
घरविशेषवेंकय्या नायडू, राजदत्त, उषा उथुप, मिथुन चक्रवर्ती यांना पद्म पुरस्कार प्रदान

वेंकय्या नायडू, राजदत्त, उषा उथुप, मिथुन चक्रवर्ती यांना पद्म पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा

Google News Follow

Related

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू (पद्मविभूषण), उषा उथुप, मिथुन चक्रवर्ती (पद्मभूषण), प्रख्यात सिनेदिग्दर्शक राजदत्त (पद्मभूषण), सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक, भरतनाट्यमच्या नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम (पद्मविभूषण), माजी राज्यपाल राम नाईक (पद्मभूषण), तेजस पटेल (पद्मभूषण), खलील अहमद (कलाक्षेत्र, पद्मश्री), रोहन बोपण्णा (टेनिस, पद्मश्री), गुलाम नबी दार (कला, पद्मश्री) अशा सर्व मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आदिंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, साहित्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राजदत्त यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी एक्सवर म्हटले आहे की, ज्येष्ठ मराठी सिने दिग्दर्शक, संस्कार भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुरुमू यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. दत्ताजींचे मनापासून अभिनंदन.

हे ही वाचा:

भगवान रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री?

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांची सुटका नाहीच; तिहारमधील मुक्काम वाढवला

‘काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणे सुद्धा गुन्हा’

बारामतीत तुतारी घेतलेल्या माणसाविरुद्ध ‘तुतारी’

वेंकय्या नायडू हे केंद्रीय मंत्री होते तसेच याआधीच्या काळात त्यांनी उपराष्ट्रपती म्हणूनही कार्यभार सांभाळला होता. त्याअंतर्गत ते राज्यसभेचे सभापतीही होते. राजदत्त यांची सिनेक्षेत्रातील कारकीर्द उल्लेखनीय राहिलेली आहे. त्यांनी शापित, अष्टविनायक, मधुचंद्र, अर्धांगिनी, माफीचा साक्षीदार, सर्जा अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

उषा उथुप या आपल्या भरदार आवाजासाठी ओळखल्या जातात. त्या आवाजाच्या जादूने त्यांनी श्रोत्यांवर एक वेगळी छाप सोडली. पाश्चात्य संगीताचा एक वेगळा पैलू त्यांनी दाखवून दिला. मिथुन चक्रवर्ती यांनीही आपल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून हिंदी चित्रपटसृष्टीची सेवा केली. नायक म्हणून आणि नंतर चरित्रनायक म्हणूनही त्यांनी भूमिका केल्या.

 

२०२४च्या यादीत १३२ जणांची नावे समाविष्ट होती. त्यात पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण, ११० पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे यात ३० महिलांचा समावेश होता. ९ जणांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोमवारी काही जणांना हे पुरस्कार देण्यात आले तर पुढील आठवड्यात उर्वरित मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा