34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामापन्हाळगडावर चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात

पन्हाळगडावर चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात

१०० फूट उंचीवरून खाली कोसळून एक मुलगा गंभीर जखमी

Google News Follow

Related

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटाच्या सेटवरील कर्मचारी पन्हाळगडाच्या तट बंदीवरून कोसळून गंभीर जखमी झाला आहे. सध्या कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तटबंदीवरुन कोसळलेल्या या तरुणाचे नाव नागेश खोबरे असे असून चित्रीकरणादरम्यान मोबाईलवर बोलत असताना नागेशचा तोल जाऊन तो तटबंदीवरुन  १०० फूट उंचीवरून खाली  कोसळल्याची माहिती मिळत आहे. नागेशला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असून ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटासाठी घोड्यांची निगा राखण्याचे काम तो करत होता.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत असून बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार असून या चित्रपटाचा त्याचा लूक सुद्धा बाहेर आला आहे. दरम्यान, या चित्रपटात विशाल निकम, हार्दिक जोशी, प्रवीण तरडे, , डॉ. उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे हे या चित्रपटांत प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर याचा लूक देखील उघड करण्यात आला होता. पण आता, या चित्रपटाबद्दलची महत्वाची बाब म्हणजे सत्या मांजरेकरला या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा होत आहे. शिवप्रेमींनी सत्या याच्या निवडीने मोठ्या प्रमाणात टीका केली होती.

हे ही वाचा:

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

कांदिवलीत महारोजगार मेळाव्याने दिल्या नोकऱ्या आणि घसघशीत पगार

सत्या मांजरेकर हा छत्रपतींचा मावळा शोभत नसल्याने त्याला हि भूमिका देऊ नये अशी भूमिका शिवप्रेमींकडून होत होती.दरम्यान याच विरोधामुळे महेश मांजरेकर यांनी आपल्या मुलाला सत्याला या भूमिकेतून काढून टाकल्याचे आता बोलले जात आहे. कसा झाला अपघात ? १९ वर्षीय नागेश हा मोबाइलवर बोलत त्याचे बोलणे संपवत पन्हाळगडाच्या सज्ज कोटीच्या उत्तर बाजूच्या तटबंदीवरुन खाली जात होता आणि त्यावेळीच त्याचा तोल गेला. सेटवर उपस्थित असलेल्या लोकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच त्यांच्या मदतीसाठी १०० फूट खाली दोर सोडून त्याला खालून बांधून वर आणण्यात आले. या अपघातात नागेच्या डोक्याला आणि छातीला गंभीर जखमा झाल्या असून सध्या त्याच्यावर उपचार चालू आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा