29.6 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरक्राईमनामानड्डा यांचा ‘पीए’ असल्याचे सांगत आमदाराकडून पैशांची मागणी !

नड्डा यांचा ‘पीए’ असल्याचे सांगत आमदाराकडून पैशांची मागणी !

तोतया स्वीय सहायकाने महाराष्ट्रासह गोवा आणि नागालँडमधील आमदारांकडून पैसे मागितल्याचे समोर आले आहे.

Google News Follow

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पीए असल्याचे सांगत गुजरातमधील एका व्यक्तीने महाराष्ट्रातील भाजप आमदारांना मंत्रिपदे देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून एका व्यक्तीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातील पक्षाच्या आमदारांकडे पैशांची मागणी केली. गुजरातमधील मोरबी येथील रहिवासी असलेल्या नीरजसिंग राठोड याला नागपूर पोलिसांनी अनेक भाजप आमदारांना फसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. राठोड याने विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, तानाजी मुटकुळे आणि नारायण कुचे या चार भाजप आमदारांशी संपर्क साधला आणि त्यांना महाराष्ट्रात मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवले.

जेपी नड्डा यांचा पीए असल्याचे भासवून त्याने लाखो रुपयांची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने या आमदारांना पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. एवढेच नाही तर आरोपी नीरज सिंग याने या आमदारांना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सारखा आवाज असलेल्या व्यक्तीशी बोलायला लावले. भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी नीरज राठोड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली आहे. त्यांनी नीरज राठोड यांच्याशी किमान चार वेळा संपर्क साधून त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात नगरविकास मंत्रिपदाचे आमिष दाखवले होते.

हे ही वाचा:

पेसमेकर बसवलेल्या महिलेचा एव्हरेस्ट सर करताना मृत्यू !

काँग्रेस प्रवेश केला, राजदूतपद काढले; गिर्यारोहकाने केली म. प्र. सरकारवर टीका !

इम्रानच्या घराबाहेर पोलिस छाप्याच्या तयारीत !

वानखेडेंवरील प्रतिज्ञापत्रात फ्लॅट, महागडी घड्याळे, परदेश दौरे

आम्हाला आमदार विकास कुंभारे यांच्या पीएची लेखी तक्रार मिळाली. नीरज सिंह राठोड यांनी आमदारांना पाच ते सहावेळा फोन करून गुजरातमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निधीची मागणी केली होती. आमदाराच्या तक्रारीच्या आधारावर, एक गुन्हा दाखल करण्यात आला, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी विनोद पाटील यांनी सांगितले. नागपुरातील कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी फसवणुकीसह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नीरज याने कुंभारे यांच्याशिवाय कामठीचे आमदार टेकचंद सावकर , हिंगोलीचे तानाजी मुटकुले, बदनापूरचे नारायण कुचे व नंदूरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालँडचे बाशा मोवाचँग यांनाही मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा