उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाअंतर्गत मागील आठ वर्षांत राज्य पोलिसांनी २३४ कुख्यात गुन्हेगारांचा एन्काउंटर करून त्यांना यमसदनात पाठवले आहे. पोलिसांनी एकूण १४ हजार ७४१ चकमकी केल्या, ज्यात ३० हजार २९३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आणि ९२०२ गुन्हेगार जखमी झाले. या कारवाईत १८ पोलिसांना हौतात्म्य पत्करावं लागलं तर १७०० पोलिस जखमी झाले.
मेरठमध्ये सर्वाधिक कारवाई
DGP राजीव कृष्णा यांच्या माहितीनुसार, मेरठ झोनमध्ये सर्वाधिक ४१८३ चकमकी झाल्या. त्यात ७८७१ गुन्हेगारांना अटक करण्यात आली तर २८३९ गुन्हेगार जखमी झाले. ७७ कुख्यात गुन्हेगारांना ठार मारण्यात आले. या सगळ्या चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांची संख्या ४५२ असून हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांची संख्या आहे २.
हे ही वाचा:
तेलंगणात १२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!
डॉ. केशव बळीराम हेडगेवार; राष्ट्रभक्ती, शिस्त आणि आत्मबलिदानाचे प्रतीक
पंतप्रधान मोदी दोन दिवसांत तीन राज्यांचा करणार दौरा!
वाराणसी दुसऱ्या क्रमांकावर
-
चकमकी: १०४१
-
अटक: २००९ गुन्हेगार
-
ठार: २६
-
गुन्हेगार जखमी: ६०५
-
पोलिस जखमी: ९६
तिसऱ्या क्रमांकावर आग्रा झोन
-
चकमकी: २२८८
-
अटक: ५४९६
-
ठार: १९
-
जखमी गुन्हेगार: ७१५
-
पोलिस जखमी: ५६
इतर प्रमुख आकडेवारी:
झोन/कमिश्नरी | चकमकी | ठार गुन्हेगार |
---|---|---|
लखनऊ झोन | ७९० | १५ |
प्रयागराज झोन | ५०६ | १० |
बरेली झोन | १९६२ | १५ |
कानपूर झोन | ६५७ | ११ |
गोरखपूर झोन | ५९४ | ८ |
लखनऊ कमिश्नरी | १२६ | ११ |
गौतमबुद्ध नगर | १०३५ | ९ |
कानपूर कमिश्नरी | २२१ | ४ |
वाराणसी कमिश्नरी | ११८ | ७ |
आग्रा कमिश्नरी | ४२६ | ७ |
प्रयागराज कमिश्नरी | १२६ | ५ |
यूपी पोलिसांनी गुन्हेगारीवर कडक नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या कारवाईचा हा आलेख अत्यंत परिणामकारक आहे. विशेषतः मेरठ झोनने या मोहिमेत आघाडी घेतली आहे. योगी सरकारच्या ‘कायदा आणि सुव्यवस्था’बाबतच्या कठोर भूमिकेचे हे ज्वलंत उदाहरण मानले जात आहे.
