राजस्थानच्या भरतपूरमधील २० वर्षीय हिंदू मुलगी मुस्लिम मुलगा मुबारकच्या प्रेमात पडली. मात्र त्याच्याशी निकाह केल्यानंतर तो तिचा रोज अमानुष छळ करू लागला. या मुलीचे नावही नंतर आयेषा असे बदलण्यात आले.
राजस्थानच्या मेवात भागातील डीगच्या कैथवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ही मुलगी नोएडातील यथार्थ रुग्णालयात प्रशिक्षण घेत होती.
फेसबुकच्या माध्यमातून तिची ओळख डीगमधील झेंझपुरी गावात राहणाऱ्या मुबारकशी झाली. आरोपीने तिला जाळ्यात अडकवले आणि १ सप्टेंबर २०२३ रोजी तो तिला सिकरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेला गावात घेऊन गेला. तिथे त्याने तिला १० दिवस ठेवले आणि तिच्याशी निकाह करून तिचे नाव आयेषा असे बदलले. त्यानंतर तो तिला त्याच्या झेंझपुरी गावात घेऊन गेला आणि ती हिंदू देवतांची पूजा करत असल्याबद्दल तिला मारहाण करू लागला. हिंदू देवतांची पूजा करू नये आणि केवळ नमाजाचेच पठण करावे, यासाठी तो तिच्यावर दबाव आणू लागला. तसेच, तिला जबरदस्तीने मांसाहार करण्यास भाग पाडू लागला. तसेच, तिने रमझानमध्ये उपवास करावेत, यासाठीही तो तिच्यावर दबाव आणू लागला. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा त्याने मारहाण केली. तिला घराबाहेर पडण्यास आणि घराबाहेरील कोणत्याही व्यक्तीशी बोलण्यासही बंदी होती. मुलीकडे संवादाचे कोणतेही साधन नव्हते.
हे ही वाचा:
‘मिस युनिव्हर्स २०२४’ स्पर्धेत सहभागी होण्याच्या सौदी अरेबियातील मॉडेलच्या दाव्याबाबत संभ्रम
“आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात पाया रचला”
‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले
यूपी पोलीस पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात!
एके दिवशी पीडितेने आरोपीचा फोन हिसकावून घेतला आणि तिच्या कुटुंबीयांना तिच्यावरील आपबिती ऐकवली. यानंतर पीडितेचे कुटुंब आपल्या मुलीच्या सुटकेसाठी झेंझपुरी गावात पोहोचले. तरीही आरोपीने मुलीला जाऊ देण्यास नकार दिल्याने कुटुंबीयांनी कामण पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पीडित आणि आरोपी दोघांनाही ठाण्यात नेऊन चौकशी केली. मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पीडितेच्या शरीरावर हल्ल्याच्या खुणा पाहून कुटुंबाला धक्का बसला. शिवाय, आरोपीने पीडितेला नोएडामध्ये घेतलेल्या शिक्षणापासूनही वंचित ठेवले. तथापि, आरोपीविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही आणि चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले.