उत्तर प्रदेश पोलीस शिपाई भरती परीक्षा पेपर लीक प्रकरणी आता पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.एसटीएफच्या टीमने पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी राजीव नयन मिश्रा याला अटक केली आहे. आरोपीने यापूर्वीही अनेक मोठ्या नोकरभरती परीक्षांचे पेपर लीक केल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
यूपी कॉन्स्टेबल भरती परीक्षा पेपर लीक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राजीव नयन मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. एसटीएफच्या पथकाने आरोपी राजीव नयन मिश्रा याला कनकाखेडा, मेरठ येथून अटक केली आहे. तो मूळचा प्रयागराज येथील आहे. विशेष म्हणजे यूपी पोलिसांनी पेपर लीक प्रकरणी आतापर्यंत ३०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.
हे ही वाचा:
दिल्ली जल मंडळ घोटाळ्यातील लाचेची रक्कम ‘आप’च्या निवडणूक निधीसाठी!
एक काळ असा होता जेव्हा नेहरू म्हणाले होते ‘भारत दुसरा, चीन पहिला’
“संजय राऊतांनी स्वतःची शिवसेना संपवून राष्ट्रवादी संपवली आता काँग्रेसही संपवतायत”
अनिल परबांच्या दापोलीमधील साई रिसोर्टवर हातोडा!
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी(२ एप्रिल) संध्याकाळी गुप्तचराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यूपी पोलिसांनी राजीव नयन मिश्रा याला अटक केली. आरोपी प्रयागराजमधील आमोरा भागातील रहिवासी आहे. अलीकडे तो ९७ भारत नगर जेके रोड, भोपाळ येथे राहत होता.
दरम्यान, आरोपीने यापूर्वीही अनेक भरती परीक्षांचे पेपर लीक केल्याचे पोलिसांनी सांगितले. नुकतेच त्यांचे नाव एनएचएम घोटाळ्याशीही जोडले गेले होते.तो यूपी पोलीस भरती पेपर लीक प्रकरणाच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि यूपी टेट पेपर लीक प्रकरणी कौशांबी येथे तुरुंगात गेला आहे.आता एसटीएफची टीम आरोपींची सखोल चौकशी करत आहे.