ईडीने मंगळवारी आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचा आणखी एक आरोप केला. दिल्ली जल मंडळ घोटाळ्यातील लाचेची रक्कम पक्षाच्या निवडणूक निधीकडे वळती केली गेल्याचा आरोप ईडीने केला आहे.दिल्ली जल मंडळाचे माजी मुख्य इंजिनीअर जगदीश कुमार अरोरा यांनी दोन कोटी लाचेची रक्कम त्यांचे विभागातील सहकारी आणि ‘आप’च्या निवडणूकनिधीसाठी वळती केली होती, असा आरोप ईडीने केला आहे.
जगदीश कुमार अरोरा, त्यांची पत्नी अलका अरोरा, अनिल कुमार अग्रवाल (उपकंत्राटदार व इंटिग्रल स्क्रू इंडस्ट्रिजचे प्रोप्रायटर) आणि एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (दिल्ली जल मंडळाचे कंत्राटदार) यांची सुमारे आठ कोटी ८० लाखांच्या संपत्तीवर याआधीच टाच आणण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले. या सर्व मालमत्ता दिल्लीतच आहेत.
दिल्ली जल मंडळात भ्रष्टाचार आणि लाचखोरीची प्रकरणे घडल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या तपासांतर्गत आर्थिक गैरव्यवहाराचा हा नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
एक काळ असा होता जेव्हा नेहरू म्हणाले होते ‘भारत दुसरा, चीन पहिला’
अनिल परबांच्या दापोलीमधील साई रिसोर्टवर हातोडा!
“संजय राऊतांनी स्वतःची शिवसेना संपवून राष्ट्रवादी संपवली आता काँग्रेसही संपवतायत”
तैवानला ७.२ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; गेल्या २५ वर्षातील शक्तीशाली भूकंप
दिल्ली जल मंडळाचे तत्कालीन मुख्य इंजिनीअर जगदीशकुमार अरोरा यांनी तांत्रिक पात्रतेचे निकष पूर्ण न करूनही एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला ३८ कोटींचे कंत्राट दिले होते, असा दावा ईडीने केला आहे.
‘दिल्ली जल मंडळाकडून देयकापोटी मिळालेल्या २४ कोटी रुपयांपैकी अवघे १४ कोटी रुपये कंत्राटी कामावर खर्च करण्यात आले तर, उर्वरित सर्व पैसे लाचखोरीत करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.
‘जगदीश कुमार अरोरा यांनी तीन कोटी १९ लाख रुपयांची लाच घेतली होती. त्यातील दोन कोटी रुपये दिल्ली जल मंडळाचे अधिकारी आणि आम आदमी पक्षाला निवडणूक निधी म्हणून देण्यात आले,’ असे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.