भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी हे गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ‘गेल्या ६ महिन्यांपासून मी कॅन्सरशी झुंज देत आहे. आता मला वाटले की लोकांना सांगायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. सर्व काही पंतप्रधानांना सांगितले आहे. देश, बिहार आणि पक्षाचा आभारी आणि सदैव समर्पित.
सुशील मोदींच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ते चारही सभागृहांचे सदस्य राहिले आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री असण्यासोबतच सुशील कुमार मोदी राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. आपल्या ३३ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सुशील मोदी यांनी राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्यही राहिले आहेत. सुशील मोदी यांनी बिहार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे.
हे ही वाचा:
तिबेट क्षेत्राला ६० भौगोलिक नावे जाहीर करा
पाँडिचेरी विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या प्रमुखांना दणका
मयांक यादवच्या वेगवान गोलंदाजीने बेंगळुरूच्या प्रेक्षकांमध्ये सन्नाटा!
दिल्ली जल मंडळ घोटाळ्यातील लाचेची रक्कम ‘आप’च्या निवडणूक निधीसाठी!
सुशील कुमार मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, ते ६ महिन्यांपासून कर्करोगाने त्रस्त आहेत.पण या आजराबद्दल त्यांनी आता जनतेला सांगितलं.लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बिहारमध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत सुशील मोदी कोणत्याही मंचावर दिसत नव्हते. त्यामुळे लोकांची भीती दूर करत त्यांनी आपल्या आजाराची माहिती दिली आहे.
सुशील मोदींना राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने भाजप त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवेल अशी शक्यता वर्तवली जात होती.मात्र नुकतीच पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली तेव्हा त्यात सुशील मोदींचे नाव नव्हते. यावरून सुशील मोदी लोकसभा निवडणूकही लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.दरम्यान, सुशील मोदी गेल्या अनेक महिन्यांपासून सार्वजनिक व्यासपीठांपासून अंतर राखत आहेत.ते नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात आपल्या आजाराची माहिती त्यांनी आज(३ एप्रिल) सोशल मीडियावर दिली.