33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरक्राईमनामामुख्तार अन्सारीचा प्रवास; स्वातंत्र्य चळवळ, वीरचक्र मिळविणाऱ्या कुटुंबातला मुलगा ते गुन्हेगार

मुख्तार अन्सारीचा प्रवास; स्वातंत्र्य चळवळ, वीरचक्र मिळविणाऱ्या कुटुंबातला मुलगा ते गुन्हेगार

गुन्हेगारी जगताच्या दिशेने टाकली पावले

Google News Follow

Related

कुख्यात गुंड आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी याचा ६०व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने उत्तर प्रदेशातील बांदा येथील तुरुंगात मृत्यू झाला. त्याला तातडीने नजीकच्या वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रमझानचा उपास सोडल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील माऊ मतदारसंघातून पाचवेळा जिंकून आलेल्या मुख्तारवर ६०हून अधिक खटले दाखल आहेत. सध्या तो बांदा जिल्हा तुरुंगात कैद होता.

मुख्तार याचे कुटुंब स्वातंत्र्यलढ्यातही सहभागी झाले होते. मात्र मुख्तार याचा गुंडांच्या टोळीशी संपर्क आला आणि त्याची वाटचाल गुन्हेगारीकडे सुरू झाली. लवकरच गुन्हेगारी कृत्यांमुळे त्याचे स्वतःचे साम्राज्य निर्माण झाले. कोणी अन्सारी याला रॉबिनहूड असे म्हणत असले तरी काहीजण त्याच्या गुन्हेगारी कारवायांकडे लक्ष वेधतात.

देशप्रेमी, स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबात जन्म

सन १९६०मध्ये उत्तर प्रदेशातील युसुफपूरमध्ये जन्मलेल्या मुख्तार अन्सारी याचा प्रवास हा गुन्हेगारी ते राजकीय असा झाला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबात मुख्तार या जन्म झाला. त्याचे आजोबा मुख्तार अहमद अन्सारी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सन १९२७मध्ये पक्षाचे अध्यक्षपदही भूषवले होते. मुख्तार अहमद अन्सारी सुरुवातीला मुस्लिम लीगमध्ये होते. मात्र पक्षाच्या फुटीरतावादी भूमिकेमुळे त्यांनी पक्षापासून फारकत घेतली. त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे कुलगुरूपदही भूषवले आहे. ते या पदावर त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९३६पर्यंत होते. तर, त्यांच्या आईचे वडील ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे भारतीय लष्करात उच्च पदावर होते. सन १९४८मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील नौशेरा भागात पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात त्यांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले होते.

हे ही वाचा:

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

जम्मूहून श्रीनगरला जाणारी टॅक्सी दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

 

गुन्हेगारी जगतात पाऊल

स्वातंत्र्यसैनिकांचा महान वारसा असतानाही अन्सारी याने वेगळा मार्ग निवडला. त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात १९८०च्या दशकात पूर्वांचलच्या अराजकतेच्या दरम्यान झाली, हा प्रदेश सरकारी करारासाठी गुन्हेगारी टोळ्यांसाठी कुप्रसिद्ध होता. मुख्तार याने उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी टोळ्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले. दहशतीचे दुसरे नाव मुख्तार असे होते. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, सशस्त्र दंगली आणि फसवणूक यांसारखे गुन्हे दाखल असून अनेक खटल्यांत तो दोषीही ठरला आहे. सन १९८८मध्ये गाझिपूरमधील एका जमिनीच्या वादातून सच्चिदानंद राय यांची हत्या झाली होती. या पहिल्या गंभीर प्रकरणाशी अन्सारीचा संबंध जोडला गेला. वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या वादातून ब्रजेश सिंग या माफियाशीही त्याचा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर कंत्राटदारासह आणखी काहींची हत्या करून त्याने दहशत निर्माण केली होती. टोळीयुद्धातून सन २००२मध्ये त्याच्या वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार झाला होता. तेव्हा त्याची तीन माणसे मारली गेली होती. या घटनेनंतर पुढील काही काळ या भागात रक्तपात बघायला मिळाला.

राजकीय कारकीर्द

मुख्तारची राजकीय कारकीर्द बहुजन समाजवादी पक्षात असताना बहरली. त्याने सन १९६६मध्ये पहिल्यांदा मऊ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सलग पाचवेळा तो या मतदारसंघातून विजयी झाला आहे. तेव्हा त्याला गरिबांचा मसिहा म्हणून दाखवले जात होते. कालांतराने त्याची आणि त्याच्या भावाची बसपमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्याने कौमी एकता दलाची स्थापना केली होती. तुरुंगवास भोगल्यानंतरही, अन्सारीची सावली पूर्व उत्तर प्रदेशच्या राजकारणावर पसरली होती. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याचा मुलगा अब्बास अन्सारी याने त्याचा राजकीय वारसा पुढे चालू ठेवला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा