29.6 C
Mumbai
Tuesday, May 12, 2026
घरक्राईमनामाबनावट कागदपत्रांच्या आधारे जन्माचे दाखले मिळवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्माचे दाखले मिळवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांकडून 'एसआयटी'ची स्थापना

Google News Follow

Related

मुंबई- बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्माचे चुकीचे दाखले मिळवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून (क्राईम ब्रँच) सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता, मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी एका विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.
या संदर्भातील गुन्हे शाखेकडे दाखल गुन्हे आणि इतर तक्रारींमधून असे समोर आले आहे की, अशा प्रकारे फसवणूक करून मोठ्या प्रमाणावर जन्माचे दाखले मिळवण्यात आले आहेत. या संपूर्ण रॅकेटचा छडा लावण्यासाठी ही विशेष समिती नेमण्यात आली आहे.
हे ही वाचा:

‘मी हरले नाही, राजीनामा देणार नाही…आमचा नैतिक विजय झालाय!’

महाराष्ट्रातील सहकारी बँकांवर आरबीआयचा दंड

इंडिगोच्या विमानात पॉवर बँक पेटली; प्रवाशांची आपत्कालीन सुटका

विमान चुकल्याचे कारण सांगत मुंबई विमानतळावरच तरुणीला हातोहात बनवले
या एसआयटी चे प्रमुख म्हणून सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हे असतील तर अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे), मुंबई, अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा), मुंबई पोलीस उपायुक्त (डिटेक्शन), गुन्हे शाखा, यांच्यासह इतर पोलीस अधिकारी या एसआयटी मध्ये असतील. बनावट कागदपत्रांचा वापर करून जन्मनोंदणी दाखले मिळवणाऱ्या टोळीचा शोध घेणे, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस आयुक्तांनी स्वतः यावर लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हे शाखा आता या फसवणुकीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा