31 C
Mumbai
Friday, August 28, 2026
घरक्राईमनामाहाफिज सईद, लखवीविरुद्ध मुंबई पोलिस घेणार इंटरपोलची मदत

हाफिज सईद, लखवीविरुद्ध मुंबई पोलिस घेणार इंटरपोलची मदत

केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत करणार प्रयत्न

Google News Follow

Related

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातील फरार सहा पाकिस्तानी आरोपींविरोधात न्यायालयाने जारी केलेला आदेश बजावण्यासाठी मुंबई पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत (एमएचए) इंटरपोलची मदत मागितली आहे. या सहा आरोपींमध्ये लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि २६/११ हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकी-उर-रहमान लखवी यांचा समावेश आहे.

या प्रकरणी विशेष न्यायालयाने गेल्या महिन्यात सहा फरार आरोपींना न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देत आदेश जारी केला होता. त्यानुसार मुंबई पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात अंतरिम अहवाल सादर केला.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी पाकिस्तानमध्ये राहत असल्याने त्यांच्याविरोधातील आदेश बजावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती गृह मंत्रालयाला करण्यात आली आहे. ३ ऑगस्ट रोजी गृह मंत्रालयाकडून याबाबतची पोहोच मिळाल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

हे ही वाचा:

जपानचा ‘प्रिझन रिसॉर्ट’ चर्चेत

उबाठा शिवसेनेच्या विशाखा राऊत यांचे जातप्रमाणपत्र रद्द

कॉंग्रेसकडून वंदे मातरम कायद्यालाच केराची टोपली!

राहुल गांधींचे सोनिया गांधींसाठी ‘पेलेट गन’ मधून कव्हर फायर?

आदेश बजावल्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर होण्यासाठी ९० दिवसांची मुदत मिळणार आहे. या कालावधीत ते हजर झाले नाहीत, तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस), २०२३ मधील तरतुदीनुसार त्यांच्याविरोधात त्यांच्या अनुपस्थितीत म्हणजेच ‘इन अब्सेन्शिया’ खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू करता येणार आहे.

हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी यांच्यासह साजिद मीर, अबू अलकामा, आसिम ऊर्फ अबू काहफा आणि मेजर अब्दुर रहमान पाशा या सहा आरोपींविरोधात नव्याने आदेश जारी करण्याची मागणी निकम यांनी यापूर्वी केली होती.

बीएनएसएसच्या कलम ३५६ मध्ये फरार आरोपीविरोधात त्याच्या अनुपस्थितीत खटला चालविण्याची तरतूद आहे. आरोपी न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी न झाल्यामुळे खटल्याला होणारा विलंब टाळण्यासाठी या तरतुदीचा वापर करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

तपास यंत्रणेकडे या सहा आरोपींविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. २६/११ हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाब आणि माफीचा साक्षीदार झालेला डेव्हिड हेडली यांच्या चौकशीत या आरोपींच्या भूमिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली होती.

२६ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २००८ या कालावधीत मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात एकूण १६६ जणांचा मृत्यू झाला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा