33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरक्राईमनामामानखुर्द रेल्वे स्थानकात हत्या, निष्काळजीपणामुळे आरपीएफ जवान निलंबित

मानखुर्द रेल्वे स्थानकात हत्या, निष्काळजीपणामुळे आरपीएफ जवान निलंबित

Related

मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकावर शनिवारी (२० नोव्हेंबर) पहाटे ४ ते ४:३० च्या दरम्यान धारदार शास्त्राने ही हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव दीपक असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

शनिवारी पहाटे ४ ते ४:३० च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या लगेज डब्यातून एक व्यक्ती खाली उतरला. त्यानंतर त्याने स्थानकावर उभ्या असलेल्या दीपकच्या दिशेने जात त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दीपकचा जागीच मृत्यू झाला. ही घटना स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हे ही वाचा:

आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही

आनंद महिंद्रना बुटांच्या स्टार्टअपचा ‘आशय’ भावला!

३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

घरातला गॅस संपला आणि एसटी कर्मचाऱ्याने जीवनही संपविले

मुंबई क्राईम ब्रांचला संबंधित घटनेची माहिती मिळताच पुढील १२ तासात आरोपीला नवी मुंबईच्या वाशी येथून अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दीपकची हत्या का करण्यात आली, हे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत होते का, त्यांच्यात काही वाद झाले होते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून शोधत आहेत.

सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानकावर इतकी धक्कादायक आणि मोठी घटना घडली. पण, त्यावेळी आरपीएफ किंवा जीआरपीचा कोणताही जवान घटनास्थळी उपस्थित नव्हता. त्यामुळे आरपीएफच्या दोन जवानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा