29.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरक्राईमनामाचुलत्याच्या घरातून १५ तोळे सोने चोरुन विकत घेतली थार

चुलत्याच्या घरातून १५ तोळे सोने चोरुन विकत घेतली थार

पूजेसाठी बोलावल्याने बिंग फुटले

Google News Follow

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. चुलत्याच्या घरातून सोन्याचे दागिने चोरून त्यातून मिळालेल्या पैशांत १९ वर्षीय पुतण्याने चक्क महिंद्रा थार गाडी खरेदी केली. धक्कादायक म्हणजे, ज्या चुलत्याच्या घरातून त्याने दागिने चोरल्याचा आरोप आहे, त्याच चुलत्याला नव्या गाडीच्या पूजेसाठी आमंत्रित केले. सातवे गावात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी कोडोली पोलिसांनी पुतण्यासह चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनाराला अटक केली आहे.

सातवे येथील समर पोपट चव्हाण हा आपल्या कुटुंबीयांसह राहतो. त्याचे चुलते उमेश मारुती चव्हाण यांचे घर शेजारीच आहे. घरातील परिचयाचा फायदा घेत समरने सुमारे महिनाभरापूर्वी चुलत्याच्या घरातील तिजोरीत ठेवलेले १५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने हे दागिने गावातील सोनार संग्राम बाबासाहेब मोरे याच्याकडे विकले. या व्यवहारातून त्याला सुमारे १० लाख रुपये मिळाल्याचे वृत्त आहे. याच पैशांतून त्याने महिंद्रा थार ही महागडी गाडी खरेदी केली. चोरीच्या दागिन्यांतून गाडी खरेदी केल्याचा संशय पोलिसांच्या तपासातून पुढे आला.
हे ही वाचा:
पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावली

रेहान वाड्राच्या फोटो प्रकरणावरून राहुल गांधी – प्रियांका वाड्रात संघर्ष?

टायगरवरील गोळीबारापूर्वी हल्लेखोरांच्या बंदुकीतून हॉटेलमध्ये सुटली गोळी

लैंगिक गैरवर्तनावरून पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलमला भारतात पाठवले

दसऱ्याच्या मुहूर्तावर समरने नवीन थार घरी आणली आणि गाडीच्या पूजेसाठी चुलते उमेश चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही बोलावले. मात्र, पूजेची तयारी सुरू असताना उमेश चव्हाण यांच्या पत्नीने तिजोरी उघडली असता त्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. घरात शोधाशोध करूनही दागिने सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, घरातील आजीचे दागिने सुरक्षित होते; मात्र उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचे दागिने चोरीला गेले होते. त्यामुळे चोरीबाबत संशय निर्माण झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलिसांनी तपासादरम्यान समरच्या नव्या थार गाडीच्या खरेदीबाबत चौकशी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात समर चव्हाण आणि चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार संग्राम मोरे यांना अटक करण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १४ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी थार गाडीसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त केल्याचे वृत्त आहे. नात्यातील विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी केल्याचा आरोप आणि त्यानंतर चोरीच्या पैशांतून घेतलेल्या गाडीच्या पूजेसाठी चुलत्यालाच बोलावण्याचा प्रकार यामुळे या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा