28 C
Mumbai
Tuesday, February 3, 2026
घरक्राईमनामासुनील मानेच होता, मनसुखला फोन करणारा तावडे

सुनील मानेच होता, मनसुखला फोन करणारा तावडे

Google News Follow

Related

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात शुक्रवारी सुनील माने या माजी पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला २८ मे पर्यंतची एनआयए कोठडी सुनावली आहे.

गेल्या महिन्यात सुनील माने यांची मनसुख हिरेन प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने या प्रकरणात अटक केली आहे.

शुक्रवारी अटकेनंतर माने याला दुपारी २ च्या सुमारास एनआयए कोर्टात दाखल करण्यात आले. यावेळी मानेच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. माने सुरवातीपासून एनआयएला सहकार्य करत आहे. माने विरोधात त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. मानेची या गुन्ह्यात कोणतीही भूमिका नाही असे दावे मानेच्या वकिलांनी केले. तर मानेला शुक्रवारी पहाटे करण्यात आलेली अटक हीच मुळात कायद्याने चुकीची आहे. ४८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करणे चुकीचे आहे असे म्हणत त्यांना जामीन मिळावा अशी मागणी करण्यात आली.

हे ही वाचा:

फ्रान्स भारताच्या पाठिशी सहाय्य करण्यासाठी ठामपणे उभा

पंतप्रधानांनी केजरीवालना खडसावले, शिष्टाचार मोडू नका!

देशवासीयांचे ‘प्राण’ वाचवायला भारतीय हवाईदल झेपावले

मोदी सरकारकडून देशातील गरीबांना मिळणार मोफत धान्य

तर मनसुखच्या हत्येत मानेचा स्पष्ट सहभाग असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. तसेच काही तांत्रिक पुरावे माने विरोधात आढळून आले आहेत. अशी मांडणी एनआयए कडून करण्यात आली आहे. दरम्यान हत्येच्या दिवशी मनसुखला तावडे म्हणून फोन करणारा मानेच होता. तसेच तो हत्या झाली तेव्हा घटनास्थळी दाखल होता असे एनआयए कडून सांगण्यात आले आहे.

या सर्व युक्तीवादानंतर एनआयए कोर्टाने मानेला २८ मे पर्यंतची एनआयए कोठडी सुनावली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा