27 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरक्राईमनामायासिन मलिकला फाशी द्या - एनआयए

यासिन मलिकला फाशी द्या – एनआयए

Related

काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला मृत्युदंड देण्यात यावा अशी मागणी केंद्रिय तपास यंत्रणा अर्थात एनआयए मार्फत करण्यात येत आहे. यासिन मलिक याला न्यायालयाने दहशतवादाला आर्थिक पाठबळ देण्याच्या आरोपात दोषी मानले आहे. यासिन मलिकने आपला गुन्हा कबूल केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोषी करार दिला.

तेव्हापासूनच यासिन मलिकला काय शिक्षा होणार याची चर्चा सर्वत्र होताना दिसली. केंद्रीय तपास संस्थेनी यासिन मलिकला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्या आधी यासिन मलिकला दिल्लीतील पटियाला कोर्ट येथे आणण्यात आले. यावेळी कोर्टात यासिन मलिकच्या शिक्षेवर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यानंतर या प्रकरणातील फैसला कोर्टाने लिहून सुरक्षित केला आहे. जो आज दुपारी साडेतीन वाजता जाहीर केला जाईल.

हे ही वाचा:

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर

टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

पेट्रोल, PR आणि ठाकरे

आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले

दरम्यान आपल्या शिक्षेबाबत यासिन मलिक कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केल्यानंतर तो जवळपास दहा मिनिटं कोर्टात शांत राहिला. त्यानंतर त्यांने कोर्टाला सांगितले की मला जेव्हा सांगण्यात आले तेव्हा मी समर्पण केले. बाकी निर्णय मी कोर्टावर सोडतो. त्यांना जे योग्य वाटते ते त्यांनी करावे. त्यामुळे आता साडेतीन वाजता यासिन मलिकला फाशी होणार ही कोर्ट वेगळा काही निकाल देणारे हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,938चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा