26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरक्राईमनामामहाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक

महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक

आयसीसचा पाया पडघा येथे घालण्याचा विचार होता

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दहशतवादी संघटना ISIS च्या कटाच्या विरोधात देशभरात ४४ ठिकाणी मोठे छापे टाकले असून आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यात ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पुणे-मीरा भाईंदरचा समावेश आहे. याशिवाय कर्नाटकात एका ठिकाणी छापे टाकले जात आहेत. सर्वात मोठी बाब म्हणजे ठाण्यातील ग्रामीण भागात हे छापे पडत आहेत.

बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकिब नाचणसह बोरिवली पडघा परिसरातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, ताब्यात घेण्यात आलेल्या कडून इसिस संबंधी काही सामुग्री जप्त करण्यात आली आहे.

भिवंडीतील पडघा आणि बोरिवली गाव या ठिकाणी सर्वाधिक छापे टाकण्यात आले आहे. इसिस या संघटनेचा राज्यातील मुख्य पाया पडघ्यात रोवण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी पडघ्यातुन एनआयएने साकीब नाचनचा मुलगा शमील नाचन, नातेवाईक अकिल नाचनसह काही जणांना पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

गाझामध्ये युद्धबंदीची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाविरोधात अमेरिकेकडून नकाराधिकार

नरेंद्र मोदी जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते

‘हिंदूंना संपविण्याची भाषा करणाऱ्या अकबरुद्दीन ओवैसींकडून शपथ घेणार नाही!’

पिंपरी-चिंचवडमधील फटाक्याच्या गोदामाला आग, सहा जणांचा मृत्यू!

NIA ने अटक केलेल्या लोकांची नावे

साकिब नाचन
हसीब मुल्ला
मुसाब मुल्ला
रेहान सुसे
फरहान सुसे
फिरोज कुवर
आदिल खोत
मुखलिस नाचन
सैफ अतिक नाचन
याह्या खोत
राफेल नाचन
रझेल नाचण
शकुब दिवकर
कासिफ बेलारे
मुंढिर केप

छाप्यांदरम्यान, एनआयएने दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि परदेशी स्थित आयएसआयएस हँडलर्सच्या सहभागासह मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. एनआयएच्या तपासात भारतामध्ये ISIS च्या दहशतवादी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी कटिबद्ध लोकांचे एक जटिल नेटवर्क उघड झाले आहे.

या नेटवर्कने ISIS च्या स्वयंघोषित खलीफा (नेत्या)शी एकनिष्ठ असल्याची शपथ घेतली आणि नेटवर्क सुधारित स्फोटक उपकरणे (IEDs) देखील तयार करत होते. भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया करणे हा या संघटनेचा उद्देश होता.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा