31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरक्राईमनामागुंड आणि दहशतवाद्यांच्या संबंध प्रकरणी एनआयएकडून ३० ठिकाणी छापेमारी

गुंड आणि दहशतवाद्यांच्या संबंध प्रकरणी एनआयएकडून ३० ठिकाणी छापेमारी

पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि चंदीगडमध्ये कारवाई

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने काही राज्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. एनआयएने कारवाई दरम्यान, दहशतवादी आणि गुंडांना लक्ष्य केले आहे. एनआयएच्या पथकाने मंगळवारी, १२ मार्च रोजी सकाळी पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये छापे टाकले. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटले आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने मंगळवारी पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि चंदीगडमध्ये दहशतवादी आणि गुंडांच्या संबंधात सुरू असलेल्या तपासासंदर्भात ३० ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे. एनआयएचे पथक या चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात ३० ठिकाणी शोध घेत आहे.

हे ही वाचा..

अजित डोभाल आणि नेतान्याहू यांची भेट

कर्नाटकमध्ये कॉटन कँडी, कोबी मंच्युरियनमध्ये कृत्रिम खाद्यरंग वापरण्यास बंदी

भाजप आंध्र प्रदेशात सहा जागा लढवणार

डीआरडीओचे ”मिशन दिव्यस्त्र” यशस्वी, पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन!

पंजाबमधील फरीदकोट मधील कोटकपुरा येथील एका व्यावसायिकाच्या घराची एनआयएच्या पथक झडती घेत आहे. २७ फेब्रुवारीलाही कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे एनआयएने २७ फेब्रुवारीला दहशतवादी आणि गुंडांच्या संगनमताच्या प्रकरणात छापा टाकला होता. एनआयएने १६ ठिकाणी कारवाई केली होती. ज्यात पंजाबमधील १४ आणि राजस्थानमधील दोन ठिकाणांचा समावेश होता. याशिवाय एनआयएने सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा