31 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरक्राईमनामासहा राज्यांमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी एनआयएकडून छापेमारी

सहा राज्यांमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी एनआयएकडून छापेमारी

दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कारवाई

Google News Follow

Related

देशात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. सहा राज्यांमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकले जात असल्याची माहिती आहे.

शिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानीचा साथीदार असलेल्या परिसरात एनआयएकडून झडती घेण्यात येत आहे. लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीतील सदस्यांना आणि अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या सिंडिकेटला तोडण्यासाठी एनआयएकडून ही छापेमारी करण्यात आली आहे.

शंभरपेक्षा अधिक ठिकाणी छाप्यांमध्ये एनआयए टीमचे दोनशेहून अधिक सदस्य सहभागी आहेत, अशी माहिती आहे. जसविंदर सिंग मुलतानी हा SFJ संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूचा जवळचा सहकारी असल्याचे मानले जाते आणि तो फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकमधील गावकऱ्यांचा वीजबिल भरण्यास नकार

वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाही तर १० लाखांचा दंड

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आसामच्या वादग्रस्त ‘लेडी सिंघम’चा अपघाती मृत्यू

यापूर्वी टाकण्यात आलेल्या एका छाप्यात एनआयएने ७० हून अधिक मोबाईल जप्त केले होते. या मोबाईलमध्ये ड्रग नेक्सस आणि लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीशी संबंधित लोकांची अनेक गुपिते समोर आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा