पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळावरचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही व्हिडीओंमधून या हल्ल्याचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागत आहेत. हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेल्या काही पर्यटकांकडून नकळत रेकॉर्ड झालेल्या या व्हिडीओंमधून घटना लक्षात येत आहेत. असाच एक पहलगामचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पर्यटक ऋषी भट्ट यांचा हा व्हिडीओ आहे. झिपलाइन करत असताना त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला, तर यात हल्ल्याची घटना कैद झाली असून पार्श्वभूमीवर गोळ्यांचे आवाज ऐकू येतात. धक्कादायक बाब म्हणजे व्हिडिओमध्ये झिपलाइनचा ऑपरेटर “अल्लाहू अकबर”चे नारे देताना दिसत आहे.
संबंधित व्हिडीओ समोर येताचं “अल्लाहू अकबर”चे नारे देणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांना चौकशी एजन्सींनी चौकशीसाठी बोलावले होते. व्हिडीओनंतर झिपलाइन ऑपरेटरला आता पुन्हा बोलावण्यात आले आहे. सुरक्षा एजन्सी त्याची चौकशी करतील.
हेही वाचा..
सलग पाचव्या दिवशी पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; कुपवाडा, बारामुल्लामधील चौक्या लक्ष्य
पाकिस्तानसमोर मोठा प्रश्न : नवाज यांनी पीएम शहबाजना काय सल्ला दिला?
“पाकिस्तानसोबत चर्चा नकोच! कारवाई करा…” पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?
“मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींचे त्यांच्या पक्षावर नियंत्रण नाही का?”
ऋषी भट्ट यांनी सांगितले की, झिपलाइन ऑपरेटरने “अल्लाहू अकबर”चे नारे दिले आणि लगेचच गोळीबार सुरू झाला. “मी स्वतः झिपलाइन चालू करण्याआधी पत्नी, मुलगा आणि आणखी चार लोक समोरच्या बाजूला गेले होते. ते तिकडे असताना त्या व्यक्तीने “अल्लाहू अकबर” म्हटले नाही. पण मी झिपलाइनवर असताना त्याने तीनदा “अल्लाहू अकबर”ची घोषणा दिली आणि मग गोळीबार सुरू झाला,” असे ऋषी भट्ट म्हणाले. पुढे ते म्हणाले की, झिपलाइन करत असताना १५-२० सेकंदांत भट्ट यांना गोळीबार सुरू झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर झिपलाइनची दोरी थांबवली आणि सुमारे १५ फूट उंचीवरून खाली उडी मारली. पत्नी व मुलासोबत पळायला सुरुवात केली. त्यानंतर पत्नीशी बोलताना त्यांनी सांगितले, “माझ्या पत्नीच्या बाजूलाच दोन जोडपी होती. दहशतवादी आला, त्यांचे नाव व धर्म विचारले आणि मग त्यांच्यावर गोळीबार केला. फक्त मी झिपलाइनवर होतो म्हणून माझा जीव वाचला. जर मी पत्नीसमवेत जमिनीवर असतो, तर काय झाले असते, कल्पनाही करू शकत नाही.”