31 C
Mumbai
Friday, May 24, 2024
घरक्राईमनामासहा विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हरयाणा शाळेला नोटीस

सहा विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हरयाणा शाळेला नोटीस

ईदच्या दिवशी शाळा सुरू ठेवली

Google News Follow

Related

शाळेच्या पिकनिकची बस उलटून सहा लहान मुलांचा मृत्यू आणि २० मुले जखमी झाल्याची घटना हरयाणातील महेंद्रगडमध्ये गुरुवारी घडली. पोलिसांनी या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकासह तिघांना अटक केली आहे. तसेच, ईदच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असतानाही शाळा सुरू ठेवल्याबद्दल शाळेला कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे.

हा अपघात गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता घडला. या बसमध्ये जीएल पब्लिस स्कूलची सुमारे ४० मुले होती. ही बस कनिना येथील उन्हानी गावाजवळील एका झाडाला धडकली आणि उलटली. या प्रकरणी चालक धरमेंदर याला अटक करण्यात आली आहे. तो वेगाने गाडी चालवत होता. तसेच, काही प्रत्यक्षदर्शींच्या मते त्याने मद्यप्राशनही केले होते. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका दीप्ती आणि आणखी एक शाळेचे अधिकारी होशियार सिंग यांना अटक करण्यात आली आहे. या बसच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदतही २०१८मध्येच उलटली होती. या अपघाताचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुट्टी असतानाही शाळा सुरू का होती, याचा आम्ही तपास करत आहोत. चालकाला अटक केली असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू असल्याचे पोलिस उपअधीक्षक महेंद्र सिंग यांनी सांगितले. हरयाणाच्या शिक्षण मंत्री सीमा त्रिखा यांनी रुग्णालयातील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच, ईदची सुट्टी असतानाही शाळा सुरू का ठेवण्यात आली होती, याची कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारला केल्याचे महेंद्रगडच्या उपायुक्त मोनिका गुप्ता यांनी सांगितले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्य सरकारने चौकशीचे निर्देश दिल्याचे वाहतूक मंत्री असीम गोएल यांनी सांगितले. तसेच, त्यांनी सर्व शालेय बसचे फिटनेस सर्टिफिकेट तपासण्याचेही निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!

तिकीट मिळाले नसल्याने राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांचा पुन्हा नोकरीसाठी अर्ज

‘भारत-चीन यांच्यातील प्रदीर्घ सीमावादावर तातडीने लक्ष देण्याची गरज’

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी के.कविता यांना सीबीआयकडून अटक!

तर, या बसचालकाला मद्यप्राशनाची सवय असल्याकडे काही पालकांनी शाळा प्रशासनाला सांगितले होते, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. गुरुवारीदेखील या चालकाने मद्यप्राशन केले होते, असे काही पालकांनी शाळेच्या लक्षात आणून दिले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा