28.2 C
Mumbai
Saturday, August 1, 2026
घरक्राईमनामापंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; तरुणीविरोधात एफआयआर

पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; तरुणीविरोधात एफआयआर

नोएडा येथे झिरो एफआयआर दाखल

Google News Follow

Related

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका २५ वर्षीय महिलेविरोधात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा उत्तर प्रदेशातील नोएडा येथे नोंदवण्यात आला असून पुढील तपासासाठी तो दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

२३ जुलै रोजी जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान संबंधित महिलेने पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नोएडामधील एका व्यक्तीने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून प्रकरण दिल्ली पोलिसांकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

तक्रारीत संबंधित महिलेच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान या संविधानिक पदाचा अवमान झाला असून समाजात असंतोष आणि तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हायरल व्हिडिओची सत्यता, त्यातील वक्तव्ये आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जात आहे.

तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३५२ (शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे), ३५३(१) (सार्वजनिक उपद्रवाला चालना देणारी विधाने करणे) आणि ३५६(१) (मानहानी करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

ऑगस्टमध्येही बरसणार मान्सून; पावसाची तूट कमी होऊन १४ टक्क्यांवर

मोदींच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी मेटा इंडियाच्या प्रमुखांविरोधात गुन्हा

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्यात आढळला पाकिस्तानी फुगा

दीपके मोदींनाच भिडू लागला…पंतप्रधानपद सोडा, इन्फ्लुएन्सर बना!

कथित गुन्हा कोठेही घडला असला तरी, कोणत्याही पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर नोंदवला जातो. नंतर तो प्रादेशिक अधिकारक्षेत्र असलेल्या पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित केला जातो, जेणेकरून अधिकारक्षेत्राच्या समस्यांमुळे तपासात विलंब होणार नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाणे तपास करेल आणि त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करेल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून दिल्ली पोलीस संबंधित महिलेची ओळख, व्हिडिओची पार्श्वभूमी आणि संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा