29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामाभेसळयुक्त चहा पावडर विकणारी टोळी उद्ध्वस्त

भेसळयुक्त चहा पावडर विकणारी टोळी उद्ध्वस्त

Google News Follow

Related

प्रत्येकाची सकाळ वाफाळलेल्या चहाने होते. अनेकांचा तर चहाचा घोट घेतल्या शिवाय दिवसच सुरू होत नाही, अशा चहा प्रेमींसाठी चहा पितांना सावध रहावे,कारण तुम्ही पीत असलेला चहा भेसळयुक्त तर नाही ना? दूधभेसळी नंतर मुंबईत चहा पावडर मध्ये भेसळ करणारी टोळी समोर आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने नुकतीच चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

मुंबईच्या गुन्हे शाखेने शिवडी येथे छापा टाकून भेसळयुक्त चहा तयार करणाऱ्या टोळीला अटक करून त्याच्याजवळून ४५०किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या चहा पावडरची किंमत ८५ हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवडीच्या बंदर रोड वर ही छापेमारी करण्यात आली असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, टोळीच्या इतर सदस्याचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणी राजू अबुलअजहर शेख आणि राहुल शेख अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या आरोपींनी कुणाला आणि कुठे भेसळयुक्त चहाचा पुरवठा केला याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. ही चहा पावडर मुंबईतील चहा टपरी, चहा विक्रेते याना करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्याचा देखील शोध गुन्हे शाखे कडून घेण्यात येत आहे.

हे ही वाचा:

नेपाळ भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले माया देवी मंदिरात दर्शन

दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र

नितेश राणेंचा मुंबई पालिका आणि ठाकरे सरकारवर निशाणा

ज्ञानवापीमधली शिवलिंग सापडलेली जागा सील करण्याचे आदेश

 

याप्रकरणी पोलिसांनीभेसळयुक्त चहा पावडर विकणाऱ्या गँगमध्ये आणखी किती लोकांचा समावेश आहे या तपास सुरु केला आहे. राज्यात आधी देखील भेसळयुक्त पनीर, खवा, मावा, दुध, तेल अशा अनेक पदार्थ्यांमध्ये भेसळ केल्याच्या घटना लक्षात आल्या होत्या. आता चहा पावडरमध्येही भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाल्याने चिंता व्यक्त होतेय. दरम्यान मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याने या टोळीतील पाळेमुळे शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा