29 C
Mumbai
Sunday, September 27, 2026
घरक्राईमनामाजोगेश्वरीत कृत्रिम विसर्जन तलावात शिरताच विजेचा धक्क्याने एक दगावला

जोगेश्वरीत कृत्रिम विसर्जन तलावात शिरताच विजेचा धक्क्याने एक दगावला

१९ वर्षीय कामगाराचा मृत्यू

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

जोगेश्वरी पूर्व येथील शामनगर तलावाजवळ गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात शिरलेल्या १९ वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. रोहित भीमू राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

के/नॉर्थ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, शामनगर तलाव परिसरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी पाच कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात आले होते. त्यापैकी चार तलाव मध्यरात्रीनंतर बंद करण्यात आले होते. मात्र, कंत्राटदाराकडे काम करणारा रोहित राठोड हा बंद करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनासाठी शिरला.

हे ही वाचा:

‘नाममात्र शुल्काला विरोध नको’

बसपाची जबाबदारी मायावतींनी आकाश आनंदऐवजी सोपवली दुसऱ्या पुतण्यावर

‘राहुल गांधींनी काँग्रेस सोडून स्टँड-अप कॉमेडियन व्हावे!’

काँग्रेस हा विदुषकांचा पक्ष बनलाय!

यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच त्याला उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मेघवाडी पोलिस ठाण्याचे PSI खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित राठोड (१९) याचा या घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण तसेच बंद केलेल्या विसर्जन तलावात विद्युतप्रवाह कसा राहिला, याबाबत तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा