27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरक्राईमनामाओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालिन लँडिंग; चार जण दगावले

ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालिन लँडिंग; चार जण दगावले

Related

तेल आणि नैसर्गिक वायू आयोगासाठी (ओएनजीसी) कार्यरत असलेल्या हेलिकॉप्टरने मंगळवारी मुंबई किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग केल्याने चार जणांचा मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळी नऊ जणांसह हेलिकॉप्टर मुंबईपासून ६० नॉटिकल मैल अंतरावर सागर किरण रिगजवळ समुद्रात कोसळले. सात ONGC प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स असलेले पवन हंस हेलिकॉप्टर सागर किरण ऑइल रिगजवळ क्रॅश झाले. बचाव कार्यात ओएनजीसीचे तीन कर्मचारी आणि दोन्ही क्रू मेंबर्स वाचले. तीन कर्मचारी आणि एका तात्पुरत्या ओएनजीसी कामगाराचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आले आहेत, असे जुहू विमानतळाचे संचालक ए के वर्मा यांनी सांगितले.

हेलिकॉप्टर VT- PWI असे कॉल साइन असलेले एकदम नवीन Sikorsky S 76 D होते आणि ते पवन हंस यांनी चालवले होते. “आमचे डॉर्नियर विमान दमण एअरबेसवरून शोध आणि बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. ओएनजीसीने एक हेलिकॉप्टर आणि एक जहाजही पाठवले आहे, असे तटरक्षक दलाचे महासंचालक वीरेंद्र पठानिया यांनी यापूर्वी सांगितले होते.

“आम्ही सी किंग हेलिकॉप्टर पाठवले आहे, हार्नेस आणि डायव्हर्स असलेले प्रगत हलके हेलिकॉप्टर. त्यांनी वाचलेल्यांसाठी हेलिकॉप्टरमधून लाइफ तराफा देखील फेकल्या आहेत,असे ”भारतीय नौदलाच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.
तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की सागरी समर्थन जहाज मालवीय 16 हे सागरी बचाव समन्वय केंद्र (एमआरसीसी), मुंबईने बचाव कार्यात सामील होण्यासाठी वळवले आणि दोन जणांना वाचाविण्यात आले आहे . एमआरसीसी (मुंबई) ने आंतरराष्ट्रीय सुरक्षा नेट देखील सक्रिय केले.

हे ही वाचा:

माझ्यासमोर बसा, संभ्रम दूर करा…उद्धव ठाकरे यांचे आमदारांना आवाहन

आम्ही लवकरच मुंबईला येऊ

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा दिला राजीनामा   

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक

 

समुद्रातील एक संरक्षक जहाज वळवले जात असताना, बचाव कार्यात सामील होण्यासाठी दुसरे जहाज मुंबईहून रवाना झाले. तटरक्षक दल भारतीय नौदल आणि ओएनजीसी सोबत समन्वय साधत असून बचाव कार्याला गती देण्यासाठी आणि वाढवण्याचे काम करत आहे, असे तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा