33 C
Mumbai
Wednesday, February 11, 2026
घरक्राईमनामापंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या, प्रेयसीवरून झाला वाद

पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या, प्रेयसीवरून झाला वाद

बीडीडी चाळीत संपवले जीवन

Google News Follow

Related

भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे (वय अंदाजे २८) यांनी शनिवारी रात्री वरळी बीडीडी चाळीत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गौरी या परळ येथील केईएम रुग्णालयात डेंटिस्ट म्हणून कार्यरत होत्या. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली. काही महिन्यांपूर्वीच गौरी आणि अनंत गर्जे यांचा विवाह झाला होता.

घटनेनंतर गौरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला असून वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजला देणग्या हिंदूंच्या; दाखले मात्र मुस्लिमाना

‘निवडणुकीत घोळ झालाय, पण पुरावा नाही!’

भारताने पहि्लया दिवसाखेर मारली मुसंडी, दक्षिण आफ्रिकेचे सहा फलंदाज केले बाद

हवाई दलाच्या जवानांवर गोळी झाडणारा यासिन मलिकंच!

डॉ गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरीला आत्महेत्येपूर्वी अनंत गर्जेची प्रेयसी किरण गर्भवती असल्याची कागदपत्रे मिळाल्याने ती अस्वस्थ होती. ती कागदपत्रे आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांनी जबाब नोंदवला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ मारहाणीचे न राहता अनंत गर्जेच्या प्रेयसीचाही मुद्दा त्यात दिसून येतो आहे.

वरळी पोलीस ठाण्यात तिघांवर बीएनएस कलम १०८,८५, ३५२,३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल. आत्महत्येस प्रवृत्त करणे यासाठी  १०८ हे कलम लावण्यात आले आहे. महिलेला सासराच्या मंडळींकडून क्रुरतेची वागणूक देणे (८५) तसेच धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सायंकाळी याच वादातून घरात कोणी नसताना डॉ. गौरी यांनी गळफास लावून घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलवरून पती अनंत यांना फोन करून ‘मी आत्महत्या करत आहे’ असे कळवले होते. अनंत गर्जे हे त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या राजकीय दौऱ्यावर होते. माहिती मिळताच त्यांनी तातडीने दौरा रद्द करून घर गाठले. मात्र, गौरीने गळफास घेतल्याचे त्यांना आढळले. त्यांनी गौरीला तातडीने नायर रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा