27.8 C
Mumbai
Wednesday, August 5, 2026
घरक्राईमनामापासपोर्ट कालबाह्य, व्हिसाही संपला; स्पा सेंटरमधून थायलंडची महिला ताब्यात

पासपोर्ट कालबाह्य, व्हिसाही संपला; स्पा सेंटरमधून थायलंडची महिला ताब्यात

कोलकात्यात पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

भारतात वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असल्याच्या आरोपावरून कोलकाता पोलिसांनी थायलंडच्या एका महिलेला दक्षिण कोलकात्यातील स्पा सेंटरमधून अटक केली आहे. बेकायदेशीररीत्या भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू असलेल्या विशेष तपास मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

रविवारी सरत बोस रोड परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. तपासादरम्यान संबंधित थाई महिलेला ताब्यात घेऊन तिच्या ओळखपत्रांची आणि प्रवासाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत ती वैध कागदपत्रे सादर करू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासात तिचा थायलंडचा पासपोर्ट २०२५ मध्येच कालबाह्य झाल्याचे, तर भारतात प्रवेशासाठी मिळालेल्या पर्यटन व्हिसाची मुदत २७ फेब्रुवारी २०२१ रोजी संपल्याचे उघड झाले. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही आवश्यक परवानगी न घेता ती भारतात राहत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने अलीकडेच वैध व्हिसा किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर कोलकाता पोलिसांनी शहरासह पश्चिम बंगालमधील विविध भागांत तपास मोहीम अधिक तीव्र केली आहे.

या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, गेस्ट हाऊस, स्पा सेंटर, भाड्याच्या सदनिका आणि इतर ठिकाणी विशेष तपास आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. यासाठी स्वतंत्र पथकही नियुक्त करण्यात आले आहे. संबंधित महिला भारतात इतक्या काळ कशी राहिली, तिच्या वास्तव्यास कोणाची मदत होती का, तिचे कोणाशी संबंध होते आणि ती कोणत्याही संघटित नेटवर्कशी जोडलेली होती का, याचा तपास सध्या सुरू आहे.

हे ही वाचा:

डॉलरची घसरण अन् मौल्यवान धातूंना बूस्ट

चिन्मय कृष्ण दास यांना दोन प्रकरणांत जामीन; तुरुंगातून सुटकेची शक्यता नाही

पाकव्याप्त काश्मीरमधील वार्तांकनानंतर ‘अल जझीरा’ची अडवणूक

मोदींच्या व्हीडिओने गेमच फिरवला

या प्रकरणाची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनाही देण्यात आली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी महिलेला कोलकाता येथील फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (एफआरआरओ) समोर हजर केले जाणार असून, तोपर्यंत तिला टॉलीगंज महिला पोलिस ठाण्याच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा