29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामाभाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकाची हत्या

भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकाची हत्या

Google News Follow

Related

दादरच्या कबुतरखाना भागात घडली घटना

एका टॅक्सी चालकाने जवळचे भाडं नाकारल्याच्या रागातून प्रवाशाने टॅक्सी चालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी दादर कबुतरखाना येथे घडली. याप्रकरणी दादर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून प्रवाशाला अटक केली आहे.

छबीराज लोलई जैस्वार (५५) असे टॅक्सी चालकाचे नाव असून तो मानखुर्द येथे राहण्यास होता. तर अटक करण्यात आलेल्या प्रवाश्याचे नाव बसवराज लक्ष्मण मेलिणामणी असे आहे. दादर येथील भवानी शंकर रोडवर, कबुतरखाना या ठिकाणी छबीराज हा रविवारी सकाळी त्याची टॅक्सी घेऊन दादर येथून जात होता. यावेळी त्याला बसवराज याने हात दाखविला, त्याने त्याला सेनापती बापट मार्ग येथे जायचे आहे असे सांगितले, मात्र त्याने त्याला तिथे जाण्यास नकार दिला. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती, त्यानंतर बसवराजने तिथे असलेल्या सिमेंटच्या चौकोनी पेव्हर ब्लॉकने त्याच्या डोक्यावर मारहाण केली, या मारहाणीत छबीराज हा गंभीररीत्या जखमी झाला.

हे ही वाचा:

वॉचमनने चुकीचा नंबर दिला आणि दरोडेखोर फसले!

म्युकरमायकॉसिसवरील मोफत उपचारांवरच ‘बुरशी’

कोरोनाविरुद्ध नव्हे, मोदींविरुद्ध लढणारा मुख्यमंत्री!

भाजपाकडून पालघरसाठी मदतीची पहिली खेप रवाना

या घटनेची माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती, जखमी झालेल्या छबीराजला पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी दादर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून बसवराज मोलिणामणी याला अटक करण्यात आली आहे.

बसवराज हा मूळचा कर्नाटकचा येथे राहणारा आहे. सध्या तो दादर येथील सेनापती बापट मार्गावरील आंबेडकर नगर परिसरात राहत असून तिथेच फळविक्रेता म्हणून काम करीत होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा