29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर क्राईमनामा सोन्याच्या किमती हाराची बतावणी करणाऱ्यांना पोलिसांचा मौल्यवान सल्ला

सोन्याच्या किमती हाराची बतावणी करणाऱ्यांना पोलिसांचा मौल्यवान सल्ला

Related

व्हीडिओमध्ये दागिन्यांनी नटलेली तरुणी आणि तिच्यासोबत उभा असलेला पती..वाढदिवशी पत्नीसाठी गाणे म्हणणारा हा तरुण…त्याच्या पत्नीच्या गळ्यात अगदी गुडघ्यापर्यंत लांब असा मोठा हार…हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्या तरुणीच्या गळ्यातील हार १०० तोळ्यांचा असल्याची खुमसदार चर्चा चांगलीच रंगली. तो व्हीडिओ सर्वसामान्यांनी पाहिलाच पण पोलिसांनी त्याची विशेष दखल घेत, थेट त्या तरुणाला संपर्क साधून समज दिली.

हे ही वाचा:

वॉचमनने चुकीचा नंबर दिला आणि दरोडेखोर फसले!

भाजपाकडून पालघरसाठी मदतीची पहिली खेप रवाना

म्युकरमायकॉसिसवरील मोफत उपचारांवरच ‘बुरशी’

अनिल परबांनी शेतजमिनीवर बांधले अनधिकृत रिसॉर्ट

भिवंडीतील तालुक्यातील कोनगाव येथील रहिवासी असलेला बाळा कोळी हा तो तरुण. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांना लक्षात आले की, एवढा किमती हार जर या तरुणीच्या गळ्यात असेल तर यांना धोका संभवू शकतो. तेव्हा पोलिसांनी तातडीने त्यांना संपर्क साधून पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिसांनी दखल घेऊन हाराच्या सुरक्षेबाबत या पठ्ठ्याला पोलीस ठाण्यात बोलावून विचारताच त्याने हा हार नकली असल्याचे कबूल करून कल्याणच्या एका सुवर्णकाराकडून ३८ हजारात बनवून घेतल्याचे सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोनगाव पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून सोन्याच्या महागड्या हाराची सुरक्षा कशी कराल, एवढी महागडी वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा इतर अन्य ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला त्याला दिला. त्यावेळी बाळा कोळी यांनी हा हार नकली असल्याचे सांगितले. हार नकली असल्याचे समजताच पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला.

अलंकाराचा गाजावाजा अशा प्रकारे केल्यास सोन्याच्या दागिन्यांची माहिती चोरट्यांना समजली तर त्यामुळे चोरी व दरोड्याच्या घटना घडण्याची शकता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारे कोणतीही बाब सोशल मीडियावर टाकून त्याचे प्रदर्शन करू नये, असे आवाहन कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी केले आहे.

 

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा